पेणमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप अव्वल !
जिल्हा परिषद गटात ५ पैकी ४ जागा तर पंचायत समिती गणात १० पैकी ८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी.
अरविंद गुरव, पेण

पेण तालुका रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ निकाल (विजयी उमेदवार)
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकाल जाहीर झाला असून पाच पैकी चार जागा जिंकत भाजपने आपले वर्चस्व राखले आहे. पेणमधील खारेपाट भागामध्ये वर्षानुवर्ष असणाऱ्या पाणीटंचाईच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. शिहू गटात शिवसेना उबाठा पक्षाने भाजपचा पराभव करीत आपली राजकीय ताकद दाखवली आहे. पंचायत समिती गणात भाजपने १० पैकी ८ जागा जिंकत सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. मात्र शिहू जिल्हा परिषद गट आणि गणातील ३ जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी भाजपला धोबीपछाड देत पत्नी पल्लवी भोईर, संजय भोईर आणि प्रिती पाटील यांना विजयी करुन आपली राजकीय ताकद अधोरेखित केली.
जिते जिल्हा परिषद गट
ताई जोमा दरवडा – १३८१७ (भाजप)
पंचायत समिती गण
कमल पवार – ७३२५ (भाजप)
संजय डंगर – ५१३८ (भाजप)
दादर जिल्हा परिषद
वैकुंठ रवींद्र पाटील – १४४१३ (भाजप)
पंचायत समिती गण
स्मिता प्रमोद पाटील – ७१४४ (भाजप)
अस्मिता प्रल्हाद पाटील – ४३६० (भाजप)
महलमिऱ्या डोंगर जिल्हा परिषद गट
जनार्दन भस्मा – १३३८२ (भाजप)
पंचायत समिती गण
सुशांत खाकर – ७८०० (भाजप)
मेघा मच्छिंद्र पाटील – ६२९० (भाजप)
वडखळ जिल्हा परिषद गट
प्रभाकर वासुदेव म्हात्रे (हरी ओम) – ८१४९ (भाजप)
पंचायत समिती गण
विवेक म्हात्रे – ५६८९ (भाजप)
प्रदीप म्हात्रे – ३६३३ (भाजप)
शिहू जिल्हा परिषद गट
पल्लवी प्रसाद भोईर – ८५८३ (उबाठा)
पंचायत समिती गण
संजय भोईर – ५४८३ (उबाठा)
प्रिती प्रशांत पाटील – ६९७४ (उबाठा)

शिहू जिल्हा परिषद गटात शिवसेना उबाठा पक्षाच्या पल्लवी प्रसाद भोईर यांनी भाजपच्या शर्मिला वैकुंठ पाटील याचा पराभव करून दमदार विजयी मिळवला. डोलवी गणात शिवसेनेच्या प्रीती प्रशांत पाटील आणि शिहू गणात संजय भोईर शिवसेना उबाठाचे विजयी झाले आहेत. या तीन जागांवर भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे पेणमध्ये शिवसेना उबाठा पक्ष भाजपला राजकीय आव्हान देण्यासाठी सज्ज झाला असल्याचे आजच्या निकालात दिसत आहे.

