पेण येथे आदिवासी विकास परिषद संपन्न
आदिवासी विकास संस्कृती इतिहासाचे संवर्धन आणि समाज भवनाच्या निर्मितीवर परिषदेत मागणी.
राजमुद्रा न्यूज नेटवर्क,
आदिवासी समाजाचे गेल्या चार दशकांपासून प्रलंबीत प्रश्न समस्या बाबत जेवढे मला मनापासून करता येईल त्यासाठी या खात्याचा मंत्री म्हणून मी प्रयत्न करेन तसेच या खात्याचा कार्यभार माझ्याकडे असून आदिवासी कातकरी समाजातील शेवटच्या घरापर्यंत पर्यंत रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा व आदिवासी संस्कृती गौरवशाली इतिहासाला उजाळा मिळावा यासाठी नाशिक, जळगाव, पाठोपाठ पेणमध्ये या परिषदेचै आयोजन केले असल्याचे आदिवासी मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले ते पेण येथे आयोजित केलेल्या आदिवासी विकास परिषदेत बोलत होते. यावेळी आदिवासी महिला बचत गटांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला तसेच आदिवासी महिला स्वतःच्या पायावर उभ्या उभ्या राहव्यात आणि आपला आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवावा यासाठी महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

या परिषदेसाठी महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, राज्याचे फलोत्पादन मंत्री भरतशेट गोगावले, खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवींद्र पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत त्यांनी सुचविले विकासाचे पर्याय आणि प्रकल्प कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांनी शासनाच्या विविध योजनांची पुर्तता कशी होईल जेणेकरून आदिवासीबांधवांना आपली संस्कृती व इतिहास परंपरा आदिवासीचे देव, त्यांचे जतन व संस्कार सोपी पायवाट नव्या पिढीला समजावे हाच या आदिवासी विकास परिषदेचा मुख्य हेतू असल्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांनी पेण येथील कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले.

पेण येथील सौभाग्य इन या सभागृहात आदिवासी विकास परिषदेचे आयोजन आज करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके, महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेट गोगावले, खासदार धैर्यशील पाटील, शिक्षक आमदार आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नगराध्यक्ष प्रितम पाटील, आदिवासी विकास अप्पर आयुक्त गोपीचंद कदम, आदिवासी रायगड प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, पद्मश्री परशुराम गंगावणे आदिवासी – ठाकूर समाज संघटनेचे जिल्हा तालुका स्तरावरील पदाधिकारी आदिवासी प्रकल्प कार्यालयीन अधिकारी कर्मचारी आश्रम शाळाचे शिक्षक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी समाजातील पारंपरिक वस्तू आदिवासी वारली कलेच्या वस्तूचे स्टॉल, आदिवासी संस्कृती विविध नृत्य प्रकार यांचे प्रमुख मंत्री व पाहुण्यांना प्रारंभी दर्शन घडविल्याने उत्साह दिसून आला. यानंतर मान्यवरांचा सत्कार आणि आदिवासी महिला बचत गटांना चार लाखांचे धनादेश व वैयक्तिक लाभाच्या शिवणयंत्र पेण मधील तीन महिलांना वाटप करण्यात आले. परिषदेचे प्रास्ताविक अप्पर आयुक्त गोपीचंद कदम यांनी केले. आदिवासी प्रकल्प विभागातील प्रशासकीय कामाची व विकास योजनांबाबत माहिती दिली.
आदिवासी समाज भवन निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला असल्याचे सांगितले. सुधागड तालुक्यातील पंचवीस एकर जागेची निवड सुध्दा केली आहे. आता यासाठी पहिल्या प्रथम पन्नास कोटी नंतर पन्नास कोटी असे १०० कोटींचे बजेट असलेल्या या आदिवासी भवनाची निर्मितीसाठी आदिवासी मंत्र्यांनी प्रयत्न करावेत आमचे यासाठी सर्व सहकार्य लाभेल. – आदिती तटकरे, महिला बालकल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील आदिवासी समाजाचे स्थलांतर थांबविण्यासाठी रोजगार हमीची कामे व फुलशेती मच्छपालन यासाठी चालना देत आदिवासीना गावातच रोजगार निर्मिती मिळाली त्यामुळे स्थलांतर थांबले आहे अशा योजना आदिवासी बांधवांसाठी प्रत्येक तालुक्यात राबवाव्यात – भरतशेठ गोगावले, खारभूमी विकास आणि रोजगार हमी मंत्री, महाराष्ट्र राज्य




