ठळक बातम्याताज्या बातम्यासण / उत्सवसामाजिक

जोहेचा राजा प्रतिष्ठान हा हिंदू संस्कृती जपणारा – शर्मिला पाटील, भाजप – दक्षिण रायगड महिला मोर्चा उपाध्यक्षा

रावेची उर्मिला पाटील मानाची पैठणी विजेती.

प्रतिनिधी, पेण

हिंदू धर्म हा सर्वात मोठा असून जोहेचा राजा प्रतिष्ठान हा हिंदू संस्कृती जपणारा मंडळ असल्याचे भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड उपाध्यक्ष शर्मिला वैकुंठ पाटील यांनी जोहे येथे महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले. साखरचौथ गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमात रावे गावची उर्मिला संजय पाटील अंतिम विजेती ठरत मानाची पैठणी जिंकली.
यावेळी व्यासपीठावर भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा शर्मिला वैकुठं पाटील, महिला नेत्या वंदना म्हात्रे, पेण पंचायत समिती दादर विभाग समन्वयक प्रीती सागर पाटील, जोहेचा राजा प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्षा लता म्हात्रे, दीक्षा पेरवी, सोनल धुमाळ, स्वस्तिका बोरकर, नीलम म्हात्रे, तृप्ती पाटील, दमयंती पाटील, विजया पाटील, हर्षदा धुमाळ, रसिक रसाळ, नीलिमा पाटील, सी.आर.पी. जीविका गावंड, अस्मित्ता पाटील, श्रद्धा पाटील, पूजा मोकल, रेश्मा जाधव आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना शर्मिला पाटील पुढे म्हणाल्या की, जगात हिंदू धर्म सर्वात मोठा असून आपली संस्कृती महान आहे. आपणच आपली संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन गेलो पाहिजे. जोहेचा राजा प्रतिष्ठान हा आपली हिंदू संस्कृती जपणारा मंडळ असून दरवर्षी महिलांसाठी विधिध कार्यक्रम राबवित असतो. यापुढे पेण तालुकाच नव्हे तर रायगड जिल्ह्यातील महिलांना कार्यक्रमात सहभागी करून घ्याव्यात असे शर्मिला पाटील यांनी आवाहन केले.

जोहेचा राजा प्रतिष्ठान महिला मंडळ आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये पेण तालुक्यासह रावे, दादर, कळवे, हमरापूर, जोहे, वरेडी, उर्नोली, सोनखर, कोपर, डावरे आदी गावातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता. जोहेचा राजा प्रतिष्ठानचे हे 13 वे वर्ष असून दरवर्षी विविध समाजपयोगी उपक्रम घेण्यात येतात. यंदाही प्रतिष्ठान तर्फे महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे सादरीकरण प्राध्यापक अक्षय पाटील, रावे यांनी केले.

तर स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये रावे गावच्या उर्मिला संजय पाटील यांनी अंतिम विजेतेपद पटकवित मनाची पैठणी जिंकली तर द्वितीय क्रमांक उर्मिला प्रभाकर पाटील, रावे यांनी तसेच लकी ड्रॉ पूजा आकाश मोकल, कळवे यांना मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!