शिवसेना आम्ही पेणकर विकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित !
राजेश प्रधान, पेण
शिवसेना आम्ही पेणकर विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक २ चे उमेदवार प्रवीण शंकर पाटील व प्राजक्ता राहुल बोरेकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचार रॅलीत शहराचे नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याची प्रतिक्रिया आम्ही पेणकर विकास आघाडीचे अध्यक्ष तथा पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी दिली.
शिवसेना व आम्ही पेणकर विकास आघाडीने एकत्र येऊन पेण नगरपरिषद निवडणुकीत पेण शहराच्या शाश्वत विकासाकरिता तसेच घराणेशाही व एकाधीकारशाहीच्या विरोधात एक सक्षम पर्याय दिला आहे. पेण शहराचा विकास खुंटला आहे. विकासाच्या नावाने राज्यकर्त्यांनी स्वतःचाच विकास करून घेतला आहे. दूषित पाण्याचा प्रश्न, भाजी मंडईचा प्रश्न, मच्छी मार्केटचा प्रश्न, नाट्यगृहाचा प्रश्न पार्किंगचा प्रश्न व इतर अनेक नागरिक प्रश्न शहरात असून हे प्रश्न सोडविण्यात सत्ताधिकारी फेल ठरले आहेत त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासा करीता शिवसेना व आम्ही पेणकर विकास आघाडीचे उमेदवारांच्या पाठीशी शहराचे नागरिक खंबीरपणे उभे आहेत त्यामुळे आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास धारकर यांनी प्रचार रॅलीच्या दरम्यान दाखविला.
प्रभाग क्रमांक दोन मधील प्रवीण शंकर पाटील व प्राजक्ता बोरेकर हे दोन्हीही उमेदवार सुशिक्षित व तरुण असल्याने त्यांच्याकडे तरुण वर्गाचा कल अधिक आहे त्याचप्रमाणे प्रवीण पाटील हे शहराध्यक्ष असताना त्यांनी मागील नऊ वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडली आहे नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत प्रशासनाच्या बे जबाबदार धोरणाविरोधात वेळोवेळी आवाज उठवून सामान्यांना न्याय मिळवून दिला आहे प्रवीण पाटील कुटुंबीय व बोरेकर कुटुंबीय हे सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात सामील होत असल्याने त्यांची समाजात प्रतिमा उजळ आहे ते केवळ स्वतःच्या प्रभागातील नागरिकांनाच मदत करतात असं नाही तर ते शहरातील सर्व नागरिकांच्या मदतीला कायम हजर असतात या उमेदवारांच्या वैयक्तिक संबंधांमुळेच समोरच्या विरोधी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल असा विश्वास जैन सोशल क्लबचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक जैन यांनी यावेळी बोलून दाखविला.
पेण नगरपालिकेची निवडणूक ही भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई असुन या निवडणुकीत सत्याचाच विजय होईल असा आत्मविश्वास जीवन पाटील यांनी व्यक्त केला.




