ठळक बातम्याताज्या बातम्याराजकीय

मुख्यमंत्र्यांनी येताना नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे घेऊनच पेणला या  – नंदा म्हात्रे

पेण शहरातील विकासातील अनियमितता, भ्रष्टाचार आणि प्रलंबित प्रश्नांवर नागरिकांचा रोष.

पेण अर्बन बँक को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना अजूनही त्यांचे पैसे न मिळाल्याने रोष वाढला असून, “पैसे कधी मिळणार?” हा सरळ प्रश्न नागरिकांकडून समोर आला आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना १६५–१७० कोटी रुपयांच्या दाव्यांमध्ये अडकून पडली असून, फिल्टरेशन प्लांट कधी उभा राहणार, याविषयी आजतागायत स्पष्ट उत्तर नाही. यात भर म्हणून धोकादायक ब्रिज, उड्डाणपूलाचा न सुटलेला प्रश्न, बस वळण्यास जागा नसणे, तसेच जूनमध्ये विक्रम–मिनिडोर–रिक्षा चालकांचे स्थलांतर या सर्वांवर कोणताही ठोस आराखडा नसल्याने पेणकरांत नाराजी वाढली आहे. भाजी मंडईतील अस्वच्छता आणि व्यवस्थापनातील गोंधळामुळे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचा अपमान होत असल्याची भावना देखील तीव्र झाली आहे. या सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिकांनी कठोर भूमिका घेतली असून येणाऱ्या निवडणुकांत लोकप्रिय नेते देवा भाऊ यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्व मुद्द्यांवर लिखित आणि ठोस उत्तर द्यावे, अशी थेट मागणी करण्यात आली आहे. विकासातील अनियमितता, कोट्यवधींची टक्केवारी, अपूर्ण पाणी योजना, पीएमएवाय मधील विलंब, अर्बन बँक ठेवीदारांची फसवणूक, भाजी मंडईची अव्यवस्था, धोकादायक ब्रिज आणि रिक्षाचालकांच्या स्थलांतराचा प्रश्न या सर्वांवर स्पष्ट भूमिका जाहीर केल्याशिवाय जनतेला समाधान नाही. “पेणकरांच्या प्रश्नांना उत्तरे घेऊनच २६ नोव्हेंबरला या उत्तर द्या, मगच मत मागा” असे आवाहन नंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!