ताज्या बातम्या

तब्बल ५ वर्षांनी होणार पेणची आमसभा !

आमसभा म्हणजे काय ?                 भारत हा खेड्यांचा अर्थात गावांचा देश आहे. अनेक गावे मिळून हा देश बनलेला आहे. गावखेड्यांच्या व्यवस्थेला देशात पंचायतराज म्हणून ओळखलं जातं. ग्रामपंचायत हा या पंचायतराजचा मुलाधार आहे. ग्रामपंचायतचे कामकाम जसे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्राम सदस्य मिळून करतात आणि त्यांच्यावर ग्रामसभेद्वारे संपूर्ण मतदार अंकूश ठेवत असतात, अगदी तसेच विधानसभा मतदारसंघाचे कामकाम हे आमदार, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मिळून करत असतात. आणि तालुक्यातील अथवा विधानसभेतील सर्व मतदार आमसभेद्वारे संबंधितांवर अंकूश ठेवतात. परंतू ग्रामसभा आणि आमसभा यांचे कार्यपद्धती पूर्णतः वेगळी असते. महत्वाचा फरक म्हणजे घटनेनुसार ग्रामसभेचे जसे नियम आहेत, तसे आमसभेबाबत नाही. म्हणजे आमसभा बोलावणे आणि त्याचे कार्यचलन करणे यासाठी कुठलेही बंधन नसते. परंतू आमसभा बोलावणे आणि तिची कार्यपद्धती याबाबत काही नियम आहेत. आमसभा ही एका आर्थिक वर्षाकरिता असते. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात आमसभा होणे गरजेचे आहे. आमसभेमुळे जनतेला प्रत्यक्षात सर्व विभागांच्या कामांची माहिती होते आणि कामात पारदर्शकता निर्माण होते. तसेच जनतेला थेट अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधता येतो आणि आपले प्रश्न, समस्या मांडता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!