पेण कासमाळ कडे बेकायदेशीर दारू घेवून जाणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

पेण (किरण बांधणकर)
पेण तालुक्यातील मौजे बोरगाव हद्दीत कासमाळ कडे जाणाऱ्या रोडवर होंडा शाइन मोटारसाईकल क्रमांक एम एच ०६ बी एल ९५८ वरून जाणाऱ्या तरुणाला २२,३४० रुपये किमतीची देशी विदेशी दारू बेकायदेशीर घेवून जाताना पेण पोलिसांनी पकडले.
मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पोलिसांनी सदर ठिकाणी जावून गाडी पकडली असता त्यांना गैरकायदा बेकायदेशीर दारू घेवून जाताना रंगे हाथ सापडल्याने सदर इसमावर पेण पोलीस ठाणे येथे गु.र.नं.२१४/२०२४ दारूबंदी अधिनियम, १९४९, वाहतुक [Sec. 65(a)], दारूबंदी अधिनियम, १९४९ कलम ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.ह.संदीप शिरगावकर हे करीत आहेत.
