क्राईम

निर्दयी बापाने १ वर्षाच्या मुलीला फारशीवर आपटून मारले !

पेण तालुक्यातील देवमाळ ठाकूरवाडी येथील घटना

प्रतिनिधी, पेण

वडखळ पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या पाबळ येथील देवमाळ ठाकूरवाडी येथे राहणाऱ्या १ वर्षाच्या मुलीला बापानेच रागाच्या भरात घरातील फरशीवर आपटून मारल्याची खळबळ जनक घटना घडली असून आरोपी बापाला वडखळ पोलिसांनी अटक करुन आरोपीला अलिबाग येथील पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहीती नुसार देवमाळ ठाकूरवाडी येथे राहणारा आरोपी सुरेश पद्या दोरे वय ४० वर्षे हा रागीट स्वभावाचा असल्याने त्याचे कोणाबरोबर पटत नव्हते तर त्याच्या दोन बायका ही त्याला सोडून गेल्या होत्या तर त्याची तिसरी बायको ही दिड महिन्यापासून त्याला सोडून गेली होती.

तेव्हापासून त्याच्याकडे ४ मुले राहत होती यातील १ वर्षाच्या मुलीला (मृत विजया उर्फ बेबी) आरोपी बापाने (सुरेश दोरे याने)फरशीवर आपटून मारल्याची घटना तारिक १ जून रोजी घडली असून वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास वडखळ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!