पोलिस भरती परीक्षेत मुन्नाभाईंना मदत करणारे सर्किट अटक !
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांच्या विशेष पथकाची कामगिरी

प्रतिनिधि, पेण
रायगड जिल्ह्यातील पेण व अलिबाग येथे १० ऑगस्ट २०२४ रोजी ३९१ पदाकरीता अलिबाग व पेण येथे पोलीस शिपाई पदाकरिता लेखी परिक्षा घेण्यात आली होती. प्रत्येक परिक्षा केंद्रामध्ये अतिदक्षतेकरीता सि.सि.टी.व्ही. कॅमेरे देखील बसविण्यात आले होते. त्याप्रमाणे परिक्षा केंद्रामध्ये परिक्षार्थी उमेदवारांची तपासणी करण्यात आली असता अलिबाग पोलीस ठाण्याच्या हददीमधील ४ परिक्षा केंद्रांवर ५ जण तर पेण पोलीस ठाण्याच्या हददीमधील १ परिक्षा केंद्रावर १ जण असे एकूण ६ परिक्षार्थी यांच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक ब्लू टूथ डिवाईस चा वापर करून कॉपी करीत असताना रामदास जनार्दन ढवळे वय २३ रा. नाळवंडी जि.बिड, दत्ता सुभाष ढेंबरे वय २२ रा. मौजवाडी, जि.बिड, ईश्वर रतन जारवाल वय २१ रा. जि. जालना, गोरख गंगाधर गडदे वय २४ रा. अंबेजोगाई जि.बिड, सागर धरमसिंग जोनवाल वय २० रा. गंगापूर जि. संभाजीनगर, शेखर बाबासाहेब कोरडे वय २७ वर्षे रा. नाळवंडी जि.बिड यांना कॉपी करताना रंगेहात पकडुन अटक करण्यात आले होते. कॉपीबहाद्दर मुन्नाभाई परिक्षार्थी हे बहुतांश बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड इत्यादी विविध भागातील होते.
या कॉपीबहाद्दरांना मदत करणाऱ्यांचा शोध घेण्याकरिता विशेष पोलीस महानिरीक्षक, संजय दराडे कोकण परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अलीबाग पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड यांनी बैठक घेऊन तातडीने विशेष तपास पथक नेमण्यात आले याबरोबरच सायबर विशेष पथकाची देखील नेमणूक करण्यात आली होती.
ब्लूटूथ च्या माध्यमातून परीक्षार्थींना कॉपी करण्यास मदत करणाऱ्या पवन त्रंबक बमनावत वय २५ रा. नळणी जि. जालना, नारायण निवृत्ती राउत वय २९ रा. नाळवंडी, जि.बिड, प्रताप उर्फ भावडया शिवसिंग गोमलाडू वय २५ रा. वैजापूर जि.छ. संभाजीनगर, कुमारी नागम्मा हनुमंत इबीटदार वय २० रा. देगलूर जि. नांदेड, अर्जुन नारायण बेडवाल वय २४ रा. परसोडा जि.छ. संभाजीनगर, मंगेश बालाजी चोले उर्फ चोरमले सर वय ३४ रा. जळकोट, लातूर, संतोष सांडू गुसिंगे वय ३० रा. पैठण जि.छ. संभाजीनगर, कुमारी पुनम राम वाणी वय २३ रा. पडेगाव जि.छ. संभाजीनगर, जीवन मानसिंग नायमने उर्फ एस. राठोड उर्फ करण जाधव रा. जोडवाडी, जि.संभाजीनगर, जालींदर श्रीराम काळे वय ३२ वर्षे रा. नाळवंडी जि.बिड या १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Sent from Yahoo Mail on Android
