काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या निषेधार्थ जोडोमारो आंदोलन!
उरण विधानसभेत शिवसेनेकडून लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांचा निषेध.
संजय कदम, पनवेल
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी दर महा आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ह्या योजनेस राज्यभरातून महिलांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आणि मिळत आहे.
अनेक महिलांनी ह्या पैशातून लघू उद्योग करण्यास सुरू केले, कोणी हे पैसे घरखर्च, औषधे, मुलांच्या फी, किंवा मग हे पैसे वर्षभरासाठी साचवून त्यातून कुटुंबासाठी हक्काची जमापुंजी करत आहेत तात्पर्य महिला ह्या स्वावलंबी होत आहेत, सक्षम होत आहेत. ह्याच मुळे महाराष्ट्रात सर्व महिलांनी ह्या योजनेला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व महायुतीला पाठबळ मिळत आहे ! हीच पोटदुखी महाआघाडीतील पक्षांना झाली आहे आणि त्यामुळे ही उबाठा पक्ष असो की काँग्रेस असो अथवा राष्ट्रवादी असो हे पक्ष ह्या योजनेला विरोध करत आहेत. याच जळाऊ वृत्तीतून काँग्रेस चे आमदार सुनील केदार यांनी ह्या योजने बाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ही योजना काही कामाची नाही, ही योजना आमचे काँग्रेसचे सरकार आल्यास बंद करू बोलुन ह्या योजनेचा लाभ घेणार्या महाराष्ट्रातील तमाम बहिणींचा त्याने आपमान केला आहे. आर्थिक मदत खूप मोलाची असताना, महिला सक्षम होत असताना ते मानधन कसे वाढेल ह्याचा विचार ना करता उलट ही योजनाच काँग्रेस बंद करणार असे जाहिरीत्या बोलून त्यांनी बहिणींचा अपमान केला आहे. ह्याच विरोधात काल यांच्या उपस्थितीत उरण चारफाटा येथे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने सुनील केदार व काँग्रेस पक्षाचा धिक्कार म्हणून जोडेमारो आंदोलन घेण्यात आले.
या आंदोलनास उरण विधानसभेचे शिवसेना पक्षाचे निरीक्षक, युवासेना राज्य सचिव व शिवसेनेचे कोकण समन्वयक रुपेश पाटील, सहसंपर्क प्रमुख रमेश म्हात्रे, विधानसभा संघटक मनोज घरत, तालुका प्रमुख महेंद्र पाटील, उरण तालुकाप्रमुख महेंद्र पाटील, विधानसभा संघटक मनोज घरत, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख वैजयंती ठाकूर, महिला आघाडी उरण तालुकाप्रमुख प्रणाली म्हात्रे, उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे, उलवा शहर प्रमुख संदीप वायंगणकर, नवघर विभाग प्रमुख गणेश घरत , चांजे पंचायत समिती विभाग प्रमुख कृष्णा पाटील, उलवे शाखाप्रमुख अमित भाई आणि इतर पदाधिकार्यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला.
काँग्रेस पक्ष असेल किवा ह्या महायुतीतील घटक पक्ष आहेत ह्याना विकास नकोय, राजकरण हवंय आणि ह्या घाण राजकारणातून ही घाण मानसिकता निर्माण झाली आहे आणि ती सरकार विरोधात आणि आर्थिक लाभ घेणार्या बहिणींच्या विरोधात आहे हे काल च्या सुनील केदार यांच्या वक्तव्यावरुन दिसते आहे. त्याचा आम्ही निषेध करतोय !– रूपेश पाटील, राज्य सचिव युवासेना, कोकण समन्वयक, शिवस्सेना निरीक्षक उरण विधानसभा.

