मराठी राज्यभाषा गौरव दिनानिमित्त सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न !
कोकण कट्टा सेवाभावी संस्थेचा उपक्रम
राजमुद्रा न्यूज नेटवर्क, मुंबई
मराठी राज्यभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र विद्यालय गोरेगाव येथील शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन कोकण कट्टा या सेवाभावी संस्थे तर्फे करण्यात आले होते. या स्पर्धेत मराठी व इंग्रजी माध्यमाच्या ५ वी ते ९ वी च्या सुमारे ४५० विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी मुंबईचे आद्य शिल्पकार नामदार नाना शंकरशेट यांच्या कार्याचा लेख लिखाणासाठी दिला होता. लेख वाचना नंतर हस्ताक्षर स्पर्धेत विध्यार्थी सहभागी झाले होते.

मराठी राज्यभाषा गौरव दिना निमित्त सुरश्री संगीत प्रशिक्षण केंद्र गोरेगाव संचालिका शुभांगी देसाई, गौरांग रतनजनकर यांनी मराठी गीतांचा कार्यक्रम सादर केला. या वेळी शिक्षक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दैनिक वृत्त दिनांक चे संपादक अमित जोशी, कोकण कट्टा या सामाजिक संस्थेचे संस्थापक अजित पितळे, नुतन विद्यामंदिर गोरेगाव महाराष्ट्र विद्यालय संस्थेचे सेक्रेटरी अनिल देसाई, ईंग्लीश मिडीयम च्या मुख्याध्यापिका पुर्वा नाईक यांनी या हस्ताक्षर स्पर्धेच्या विशेष संकल्पनेची स्तुती केली व असेच विविध उपक्रम शाळेत राबवण्यासाठी कोकण कट्टा संस्थेला आवाहन केले. तसेच शाळेच्या संस्थेचे सचिव अनिल देसाई यांनी पुढील उपक्रम करण्यासाठी योग्य सहकार्य दिले जाईल असे आश्वासन दिले.
सुंदरहस्ताक्षर स्पर्धा हा उपक्रम कोकण कट्टा ही संस्था सुमारे १५ वर्ष सातत्याने राबवतअसून असून यंदाही माधवराव भागवत हायस्कुल. परांजपे विद्यालय, पार्ले टिळक विद्यालय तसेच गुहागर येथील शृंगारतळी येथील शाळेत आयोजित केला आहे. सुमारे ५००० विध्यार्थी यात सहभागी होणार आहेत ही माहिती उपस्थिताना दिली. विद्यालयाच्या शिक्षिका वाघमारे, वनमाळी, बोरे संस्थेचे सदस्य शंकर पटनाईक, महेश करमरकर, योजना आळेकर, स्नेहल कदम आदि शाळेचे शिक्षकवृंद उपस्थित होते. कायक्रम नियोजन बद्दतेने पार पडला. हा कार्यक्रम सर्वत्र शाळेत आयोजन करण्यासाठी कोकण कट्टाचे विवेक वैद्य, सुरेश भारती, हरेश फणसे, दिनेश बालगुडे, स्मिताताई पुराणिक यांनी अथक परिश्रम घेतले.

