सामाजिक

दहावीतील यशस्वी विद्यार्थी आदित्य गौरव पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी, पेण

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नुकताच दहावीतील प्रत्येक विभागातील जास्तीत जास्त टक्केवारीने उत्तीर्ण झालेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना आदित्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तालुक्यातील हमरापूर, जिते, वाशी, शिहू, वडखळ या पाच विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश करण्यात आला होता.

शिवसेना उध्दव बाळासाहेब गटाचे पेण तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्याला उपस्थित असणारे पनवेल, कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या यशाचे कौतुक करून भविष्यात हाच विद्यार्थी देशाचे नेतृत्व करणारा व्यक्ती व्हावा अशा शुभेच्छा दिल्या.तर तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी दहावीमध्ये उज्वल यश प्राप्त केल्यानंतर त्यांना आपल्या पुढील शैक्षणिक वाटचालीला प्रौत्साहन देण्याच्या उद्देशाने सदर गौरवाने सन्मानित करण्यात आले आहे असे सांगितले.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी नरेश गावंड, दर्शना जवके, नंदू मोकल, दीपक पाटील, वसंत म्हात्रे, कांचन थळे, निलेश म्हात्रे, चेतन मोकलशिवसेनेचे प्रत्येक विभागाचे विभाग प्रमुख आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!