सामाजिक

“साईछत्र एंटरप्रायजेस” आणि “व्हिस्क क्लीनिंग प्रोडक्ट्स” या कंपनीच्या माध्यमातून वृक्षारोपण !

प्रतिनिधी, पेण

डोंगराच्या मातीसाठी मातीचोरांकडून होणाऱ्या बेसुमार वृक्षतोड़ीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आणि त्यामुळेच निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. ज्यामुळे पावसाचे कमी प्रमाण आणि अनियमितेचा सामना करावा लागत आहे.

कासमाळ हे पेण तालुक्यातील अल्पावधित प्रसिद्द झालेले पर्यटन स्थळावरील स्थित असलेल्या “साईछत्र एंटरप्रायजेस” आणि “व्हिस्क क्लीनिंग प्रोडक्ट्स” या स्वच्छतेची साधने आणि उत्पादने बनविणाऱ्या कंपनीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आज कासमाळ येथे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम साजरा केला. या प्रसंगी व्हिस्क क्लीनिंग प्रोडक्ट्स आणि साईछत्र एंटरप्रायजेस कंपनीचे संचालक मंडळ आणि कर्मचारी उपस्थित होते. या वेळी आंबा, फणस, काजू, कडूलींब आदि प्रकारची फळझाडे आणि फूलझाडे लावण्यात आली. यावेळी साईछत्र एंटरप्रायजेस या कंपनीच्या संचालिका अमृता गुरव यांनी सांगितले की “देशाचे जबाबदार नागरिक या नात्याने आम्ही ही वृक्षारोपण मोहीम “व्हिस्क क्लीनिंग प्रोडक्ट्स” आणि “साईछत्र एंटरप्रायजेस” या कंपनीच्या माध्यमातून राबवीत आहोत याचा आनंद आणि समाधान आहे. या वेळी त्यांनी जबाबदार नागरिकांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन हि केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!