वैकुंठ पाटील यांच्या पुढाकाराने जेएसडब्लू च्या सीएसआर फंडातून स्टेडियमसाठी मिळणार ७० लाखांची मदत!
हमरापुर विभागात साकारणार अडीच हजार प्रेक्षकांनाचे अद्ययावत स्टेडियम
राजेश प्रधान, पेण
हमरापूर जोहे विभागातील स्थानिक खेळाडूसाठी भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करणारे लोकप्रिय युवा नेते रायगड जिल्हा भाजपचे महामंत्री वैकुंठ पाटील यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली हमरापूर लिग भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा जेएसडब्लू सीएसआर फंड प्रमुख अधिकारी सुधीर तेलंग, भाजप प्रदेश महिला सदस्या व माजी झेडपी अध्यक्षा नीलिमा पाटील, भाजपा जिल्हा महिला आघाडीच्या शर्मिला वैकुंठ पाटील, यांच्या शुभहस्ते स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला सिध्दी श्रवण वॉरीयर खारसापोली संघास एक लाख रोख रक्कम आणि भव्य ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले उपविजेतेपदाचा मानकरी वीर मराठा संघ जोहे संघाला ५० हजार रोख रक्कम आणि ट्राॅफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी गिरोबादेव भव्यदिव्य मैदानावर जेएसडब्लू कंपनी सीएसआर फंडातील सुमारे ७०लाख खर्चाची तरतूद असलेल्या प्रेक्षक गॅलरी स्टेडीयम पॅव्हेलीयन बांधकामाचे भूमिपूजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते याप्रसंगी करण्यात आले.
हमरापुर प्रीमियम लीग स्पर्धेच्या बक्षीस वितरणास गणेशमूर्तीकार नितीन मोकल जोहे बाजार समिती संचालक माजी सरपंच काशिनाथ पाटील, भाजप किसान मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष परशुराम पाटील,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाटील पेणचे नगरसेवक नीलकंठ म्हात्रे, स्मिता पेणकर आंबिवली उपसरपंच जगदीश पाटील, शंकर मोकल उद्योजक सागर पवार, समाधान चव्हाण, गोपीनाथ मोकल, सुदर्शन पाटील आदी उपस्थित होते. या स्पर्धेत तृतीय क्रमांक किमय आणि दुर्वा स्पोर्ट वरेडी तर चतुर्थ क्रमांक एस.जी. कन्स्ट्रक्शन हमरापूर संघ ठरला या दोनही संघाना अनुक्रमे २५हजार रुपये रोख रक्कम आणि ट्राॅफी देऊन सन्मानीत केले. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान सुनील पाटील याला मोटारसायकल तर उत्कृष्ट उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांना सायकल घड्याळ टीशर्ट देऊन सन्मानीत करण्यात आले.
हमरापूर लिग क्रिकेट स्पर्धेतून उत्तम खेळाडू निर्माण होऊन ते राष्ट्रीय पातळीवर चमकावेत यासाठी सर्व सोयी सुविधांनी युक्त असे प्रेक्षक गॅलरीसह खेळाडूसाठी आवश्यक असलेल्या सुविधा या वर्षात पूर्ण करण्यासाठी वैकुंठ पाटील यांच्या प्रयत्नातून गिरोबादेव मैदान व स्टेडीयम भविष्यात जोहे हमरापूर विभागातील खेळाडूसाठी वरदान ठरेल असे उपस्थित मान्यवर मंडळीनी वैकुंठ पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना मनोगतात गौरवउद्गार करताना प्रशंसा केली.सामन्याचे भव्यदिव्य आयोजन व वैयक्तिक बक्षीसांचा वर्षाव पहाण्यासाठी पाच हजार क्रिडा रसिकांची काल सायंकाळी उपस्थीती होती हे वैशिष्ट्य ठरले.




