कोकण कट्टा तर्फे वाचन संस्कृती प्रेरणा समारंभ !
नामदार नाना शंकरशेठ यांच्या २२२ व्या जयंतीचे औचित्य साधत कार्यक्रम उत्साहात साजरा.
प्रतिनिधि, मुंबई
नामदार नाना शंकरशेठ यांच्या २२२ व्या जयंतीचे औचित्य साधुन वाचन संस्कृती प्रेरणा समारंभ महाराष्ट्र विद्यालय गोरेगांव मुंबई येथे कोकण कट्टा या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थापक अजित पितळे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. नामदार नाना शंकरशेठ यांच्या जयंतीचे औचित्य साधून नानांचे सामाजिक कार्य तळागाळातील व्यक्तीसह नवीन शालेय विध्यार्थी पिढीला ज्ञात व्हावे याच भावना भावणेतून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या प्रसंगी गोल्ड व्हल्युअर्स असोसिएशनच्या सहकार्याने प्राध्यापक शाम भुर्के लिखित नामदार नाना शंकरशेठ यांचे चरित्र पुस्तके १२५ विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले. तसेच विद्यार्थांनी मराठी भाषादिनी आपल्या स्वहस्ते सुवाच्छा हस्ताक्षरात लिखाण करून शाळेत द्यावे ही स्पर्धाच या शाळेत असणार आहे. या लिखानाचा विषय नामदार नाना शंकरशेठ यांचा जीवन परिचय हा असणार आहे. या स्पर्धेमुळे नामदार नाना शंकरशेठ यांचा परिचय नवीन पिढीला ज्ञात होईल, वाचन आणि लिखाण होईल तसेच मराठी भाषा दिन सुद्धा साजरा होईल. असा त्रिवेणी संगम साधला जाईल यात शंका नाही.
गोल्ड व्हल्युअर्स असोसिएशन महाराष्ट्र प्रशासकीय सचिव सतिश पितळे यांनी विशेष सहकार्य करुन या उपक्रमात सहभाग घेऊन समारंभास सोनेरी झळाळी दिली. कोकण कट्टा अक्षररत्न स्पर्धा हा उपक्रम विलेपार्ले, लांजा, रत्नागिरी, गुहागर तसेच गणपतीपुळे येथील शाळेत सुद्धा दरवर्षी राबविण्यात येतो. या समारंभ प्रसंगी खास उपस्थिती दैसप कार्यकारिणी सदस्य महेश मनोहर पैठणकर व अरविंद बेलवलकर यांची होती. सर्व मान्यवराना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले तसेच कोकण कट्टा संस्था आणि गोल्ड व्हल्युअर्स असोसिएशन चे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळाच्या पदाधिकारी श्रीमती वर्षाताई लिमये याही आवर्जून उपस्थित होत्या.
सदर शालेय समारंभ नूतन विद्यामंदिर संचालित महाराष्ट्र विद्यालयाचे अध्यक्ष संदिप सावंत उपाध्यक्ष शशिकांत दळवी, सचिव अनिल देसाई, कोषाध्यक्ष उदय जोशी यांच्या मान्यतेने. मान्यवर मुख्याध्यापिका वसुधा कामतेकर, शिक्षक विष्णू मसूरकर, चिंतामणी भरसट, श्रीमती सुजाता बोरे, श्रीमती प्रणाली कोरगावकर, स्नेहल कदम, योजना आळेकर यांच्या योग्य नियोजत समारंभ यशस्वी संपन्न झाला.

