सामाजिक

स्वातंत्र्य दिनानिमत्त पेण पालिकेच्या रांगोळी स्पर्धा संपन्न

देशभरात यावर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. हा अमृत महोत्सव साजरा करत असताना विविध स्तरावर विविध शासनाच्या कार्यालयांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम पार पाडले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पेण पालिकेच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून जी हर घर तिरंगा मोहीम राबविली जात आहे त्या मोहिमेअंतर्गत महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये महिलांसह लहान मुलींनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. सदर महिलांनी स्वतंत्र दिनाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून पेण पालिकेच्या परिसराची शोभा देखील वाढविली. सदर रांगोळ्या पाहण्यासाठी पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांसह पेण मधील नागरिकांनी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!