कडी-कोईडा तोडून केली १६ लाखाची चोरी !
संजय कदम, पनवेल
घरात कोणी नसताना दरवाज्याचा कडी-कोईडा तोडून आत कपाटामध्ये ठेवलेले दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे १६ लाख रुपये किमतीची ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना पनवेल शहरात भरदिवसा घडली आहे.
पनवेल शहरातील महात्मा फुले रोड येथील श्री स्वामी समर्थ सोसायटी येथे राहणारे चैतन्य काळे यांचे घराचे दरवाजे बंद असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने दरवाज्याचा कडी-कोईडा तोडून आत कपाटामध्ये ठेवलेले १५ लाख ३५ हजार रुपये किमतीचे दागिने व ६० हजार रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


