सामाजिक

पेणमध्ये अक्षता म्हात्रे हिच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा !

आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

पेण (किरण बांधनकर)

पेण शहरात स्व. अक्षता म्हात्रे हिच्या हत्येच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. नवी मुंबईत अक्षता कुणाल म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिचा निर्गुण खून केल्याच्या निषेधार्थ पेण मधील नारी शक्ती मंच, शिवप्रेमी संघटना, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान व इतर संघटना यांच्या वतीने हा निषेध मोर्चा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात नारीशक्तीच्या नंदा म्हात्रे, मोहिनी गोरे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख दिपश्री पोटफोडे, नगरसेविका वसुधा पाटील, नमिता म्हात्रे, मुस्कान झटाम, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विष्णू पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष समीर म्हात्रे, माजी सरपंच महेंद्र ठाकूर, गुरव समाज संस्थेचे अध्यक्ष बंडू खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते राजन झेमसे, सी.आर. म्हात्रे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख योगेश पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटना व विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने सामील झाले होते.

यावेळी निषेध व्यक्त करताना नंदा म्हात्रे, विष्णू पाटील, समीर पाटील यांनी झालेला प्रकार हा माणुसकीच्या नात्याला काळिंबा फासणारा आहे. दोन वर्षांपूर्वी पेणमध्ये देखील एका लहान बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्गुन खून करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर एका विवाहितेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची ही घटना अतिशय गंभीर आहे. त्यामुळे शासनाने हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा व यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!