“स्नेहदीप” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.
प्रतिनिधि, मुंबई
कवयित्री स्नेहा पाडळकर लिखित “स्नेहदीप” पुस्तकाचा (काव्यसंग्रह) प्रकाशन सोहळा आज १५ डिसेंबर रोजी कवी राजन लाखे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे विश्वस्त यांच्या हस्ते सांताक्रुज येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर (राष्ट्रीय अध्यक्ष मराठी साहित्य मंडळ) उर्फ कवी गोलघुमट हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्योती कपिले (लेखिका, कवयित्री, संपादिका) या होत्या. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेत्री आतिषा नाईक यांनी हजेरी लावल्याने सोहळा अधिक संस्मरणीय झाला. लेखक नाटककार दिग्दर्शक ‘ऑल द बेस्ट’ चे लेखक, दिग्दर्शक देवेंद्र पेम यांनीही कार्यक्रमासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून थोडा वेळ काढून उपस्थित राहिले आणि स्नेहा पाडळकर यांना शुभेच्छा दिल्या. सर्वच मान्यवरांनी आपल्या वकृत्व शैलीतून स्नेहा पाडळकर यांच्या पुस्तकाचे कौतुक केले. ‘स्नेहदीप’ या पुस्तकात विविध विषयांवरच्या कविता आहेत. सर्व मान्यवर आणि रसिक यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करून “स्नेहदीप” या काव्यसंग्रही रूपी पुस्ताकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.



