क्राईम

चॉकलेटचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलींचा विनयभंग

पेण येथील दादर गावातील घटना ; गावकऱ्यांनी दिला आरोपींना चोप

राजेश प्रधान, पेण
बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच पेण तालुक्यातील दादर गावात अल्पवयीन शाळकरी मुलींना मोबाईल व चॉकलेटचे आमिष दाखवून छेडछाड करण्याची घटना घडल्याने तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. 
पेण तालुक्यातील दादर गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात शाळेत शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींना मंगळवारी दुपारी दोन च्या सुमारास अखिलेश शामजी सैनी वय २० वर्षे व मुंनुकुमार त्रिभुवन चैहान वय २२ वर्षे दोघेही सध्या राहणार जिते, मुळ राहणार धंधरा, ता. तुळशीपुर, जि. बलरामपूर-उत्तरप्रदेश यांनी मोबाईल व चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनींना हाताने बोलवण्याचा इशारा करून अश्लील हावभाव केरून त्यांची छेड काढली.
सदर प्रकार अल्पवयीन मुलींच्या नातेवाईकांना, गावकऱ्यांना समजताच त्यांनी दोन्ही परप्रांतीयांना पकडून बेदम चोप दिला व त्यांना डांबून ठेऊन दादर सागरी पोलिसांच्या ताब्यात दिले. दादर सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशे हे अधिक तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!