पेणमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीस अटक
१ लाख ७५ हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधि, पेण
रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुशंगाने आचार संहितेचा काळात आमली पदार्थांची तस्करी, विक्री आणि वापर करणाऱ्यांवर एनडीपीएस अंतर्गत कारवाई करण्यासंदर्भात सुचना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने काल १० नोव्हेंबर रोजी आरोपी सुशिल राजाराम जोशी (वय ३८ वर्ष) राहणार – नविन वसाहत, फणसडोगरी, पेण याला अटक केली आहे.
पेण पोलीस ठाणेचे पो. ना. राकेश पवार यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहिती नुसार आरोपी सुशिल राजाराम जोशी हा स्कुटी वाहनाने गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी म्हाडा कॉलनी येथे येणार आहे. या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांना पुढील कारवाई करण्याबाबत लेखी परवानगी मागीतली होती. पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना मिळालेल्या परवानगी नुसार पेण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांची दोन टिम तयार करून सापळा रचुन सुशिल राजाराम जोशी हा त्यांच्या स्कुटीवरून जात असतांना त्यास एक टिम ने त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने स्कुटी चा स्पिड वाढवुन तो पळुन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस पकडून त्याच्याकडे असलेला १ लाख ७५ हजार ८४० रुपये किमतीचा गाजा हा आमली पदार्थ आणि इतर मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पेण पोलीस ठाण्याचे अधिकारी सहा.पो.नि/निलेश राजपुत, सहा. फौ. ढोबळे, म.पो.ना शिंदे, पो.हवा. कदम, पो.ना. राकेश पवार, पो. हवा. माने आदींनी केली. तर सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व पेण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. निलेश राजपुत हे करीत आहेत.



