पेणमध्ये अवकाळी पावसामुळे १२ ठिकाणी झाडे उनमळून पडली !
पेण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांची उल्लेखनिय कामगिरी

प्रतिनिधी, पेण
अवकाळी पावसामुळे झाड पडल्याच्या घटनांमध्ये, अग्निशमन दलाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. हे कर्मचारी केवळ झाड हटवण्यासाठी नाही, तर लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठीही सज्ज असतात. अनेकवेळा झाड रस्त्यावर किंवा इमारतीवर पडल्यास, अग्निशमन दल त्वरित घटनास्थळी पोहोचून झाड हटवण्याचे काम करते, तसेच लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवते.

पेणमध्ये बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने सुमारे १२ ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पडलेली झाडे पेण नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कटर मशीन आणि जेसीबीच्या मदतीने तातडीने कापून बाजूला केली. त्यामुळे कोणतीही वाहतूक कोंडी झाली नाही आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ही मोठ्या प्रमाणात मदत झाली.



