सामाजिक

भयमुक्त रस्त्यासाठी दूरशेत ग्रामस्थ करणार १७ जूनला रस्ता रोको !

प्रतिनिधी, पेण

पेण तालुक्यातील बळवली, बेलवडे आणि मुंगोशी हद्दीतील दगडखाणी आणि क्रशर प्लांटमधून निर्माण होणाऱ्या मालाची ओव्हरलोडेड अवजड वाहनाने दुरशेत रस्त्यावरून दिवसाला सुमारे ३००-४०० ओव्हरलोडेड डंपर या चालत असताना या रस्त्यावर दुरशेततकरांचे चालणे मात्र जिकिरीचे झाले आहे भरधाव येणारे ओव्हरलोडेड डंपरने अनेक वेळा येथील स्थानिक पादचारी व बाईक स्वरांना धडक देऊन अपघात झाले आहेत.-त्याचबरोबर धूळ आणि चिखलामुळे दुरशेत मधील ग्रामस्थांच्या जगणं मुश्किल झालेले असताना या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्याबाबत वारंवार प्रशासनाकडेत मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे अखेर संतप्त दूरशेत ग्रामस्थांनी येत्या मंगळवार दिनांक १७ जून रोजी रस्ता रोको करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचे पत्र संबंधित विभाग व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.

या रस्त्यावरुन प्रवास करताना प्रत्येकाच्या मनात भय निर्माण झाले असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे असून या संदर्भात दुरशेत ग्रामस्थांनी पेण पोलीस स्टेशन, तहसीलदार पेण, उपविभागीय अधिकारी पेण यांना पत्राद्वारे माहिती देऊन आपली कैफियत शासन दरबारी मांडली. परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई अवजड वाहनांच्या वाहतुकीविरुद्ध झाली नाही. प्रशासनाचा निषेध आणि अवजड वाहतुकीपासून रस्ता भयमुक्त व्हावा यासाठी दुरशेत ग्रामस्थ मंगळवारी १७ जून २०२५ रोजी दुरशेत फाट्यावर अवजड वाहनांसाठी रास्ता रोको करणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधिक्षक रायगड, उपविभागीय अधिकारी पेण, तहसीलदार पेण, पोलीस स्टेशन पेण, विभागीय परिवहन मंडळ पेण, ग्राम पंचायत दुरशेत यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!