जनसेवा सामाजिक विकास संस्थेकडून सेवा दिन साजरा !

राजमुद्रा न्यूज़ नेटवर्क
महिन्यातून एकदा जनसेवा सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष- बंडू विरेश्वर खंडागळे यांच्याकडून माणुसकीच्या नात्यातून एक दिवस स्नेह कुंज आधार गृह संगीता नितीन जोशी संचलित नेरे पाडा, नवीन पनवेल, येथील वृद्धाश्रमामध्ये स्वखर्चाने सामाजिक बांधिलकी जपत सेवा दिन साजरा केला जातो. यावेळी काही काळ वृद्धाश्रमा मधील आजी-आजोबांबरोबर अल्पपहार केव्हातरी भोजन व्यवस्था जनसेवा सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून केली जाते. आजही सर्व आजी-आजोबांसाठी अल्पपहार व्यवस्था केली होती. यावेळी वृद्धाश्रमातील एक बाबा विनायक रिसबुड यांना कोणीही नसल्याने त्यांची सर्व जबाबदारी बंडू खंडागळे यांनी काही महिन्यापासून घेतली आहे. यावेळी महिन्यातून दोन वेळा खंडागळे हे रिसबुड यांना भेटण्यासाठी वृद्धाश्रम येथे जात असतात. या सेवा दिन कार्यक्रमाप्रसंगी यावेळी स्नेह कुंज चे मालक नितीन जोशी, त्यांच्या पत्नी संगीता जोशी, बंडू खंडागळे, पनवेल येथील संजय मोरे उपस्थित होते.


