सामाजिक

मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम-१९५० दुरुस्तीसाठी विश्व हिंदू परिषद सहकार्याच्या भूमिकेत – बंडू खंडागळे

महाराष्ट्रातील सर्व मंदिरातील पुजाऱ्यांसाठी महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे मंदिरातील गुरव- पुजारी- पुरोहित- सेवाधारी- पुजारी-यांचे हक्क आणि कर्तव्य सुरक्षित करणे, यासाठी गेली अनेक वर्षाचा गुरव समाज संघटनेच्या अनेक राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून शासकीय न्यायाचा लढा मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम कायदा – १९५० मध्ये दुरुस्ती याबाबतीमध्ये शासन दरबारी असलेला प्रश्न प्रलंबित आहे. त्याकरता आज श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान विश्वस्त अध्यक्ष सुरेश (भाऊ) कौदरे, त्याचबरोबर  इनाम-वर्ग ०३ देवस्थान जमिनी संदर्भात कायदेशीर तज्ञ ज्यांना याबाबतीत कायदेशीर परिपूर्ण  प्रक्रिया पूर्णपणे माहिती असलेले गुरव समाजातील अभ्यासू व्यक्तिमत्व रवींद्र उर्फ रविभाऊ क्षीरसागर यांच्या माध्यमातून राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय संघटक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ नितीन ढेपे आणि गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बंडू खंडागळे, नवल शेवाळे अध्यक्ष- गुरव विकास प्रतिष्ठान मुंबई, कार्यकारी अध्यक्ष- राष्ट्रीय गुरव समाज महासंघ- महाराष्ट्र यांच्या सहकार्यातून आज नवी मुंबई येथे या महत्त्वाच्या बैठकीस विश्व हिंदू परिषद प्रमुख पदाधिकारी महाराष्ट्र व गोवा पुरोहित अर्चक मठ मंदिर आयाम अनिल सांबरे तसेच राजकुमार भारद्वाज कोकण प्रांत प्रमुख हे उपस्थित होते.

या व्यतिरिक्त आज राज्यांमधील विविध मंदिरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काय केले पाहिजे. या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्याचबरोबर राजकीय प्रणालीमध्ये विधानसभा अथवा विधान परिषद त्याचबरोबर राज्यसभा आणि लोकसभा विशेष करून विधान परिषदेवरती शिक्षक मतदार संघ, पदवीधर मतदार संघ, या धरती वरती परंपरागत मंदिर सांस्कृतिक उपासक समाजासाठी सुद्धा राजकीय पटलावरती अधिकृत मग विधान परिषद अथवा राज्यसभा यावर राजकीय आरक्षण राखीव जागेची भविष्य काळामध्ये तरतूद असावी. याविषयी गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय गुरव समाज महासंघ उपाध्यक्ष- बंडू विरेश्वर खंडागळे यांनी आपली व्यक्तिगत भूमिका मांडून विश्व हिंदू परिषदेच्या मान्यवरांसमोर आग्रह धरून आपली व्यक्तिगत बैठकीच्या दरम्यान भूमिका मांडली. या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून संबंधित मान्यवरांनी सकारात्मक पाठिंबा देखील दर्शविला. त्याप्रमाणे व्यक्तिगत त्यांनी नोंद करून घेतली. यावेळी गुरव विकास प्रतिष्ठान मुंबई अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष- राष्ट्रीय गुरव समाज महासंघ नवल शेवाळे यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.

मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950 मध्ये दुरुस्ती झाल्यानंतर उपस्थित पुजारी वर्गाकडून राज्यातील अनेक प्रश्न मग धर्मदाय आयुक्त अथवा कोर्टकच्याऱ्यामधील कायद्यातील केसेस, त्याचबरोबर गावातील वाद विवाद भांडण तंटा कमी होतील, प्रत्येकाचे हक्क आणि कर्तव्य यांच्या सीमारेषा स्पष्ट झाल्यामुळे मंदिर व्यवस्थापनामध्ये सुसूत्रीपणा येईल. त्याचा परिणाम निश्चितच राज्यातील मंदिरांच्या विकासावर होईल. भविष्यामध्ये मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांनी भक्तगण यांची संख्या वाढल्याने मंदिर व्यवस्थापनाचा निश्चित फायदा होईल. या बैठकीला सर्व मंदिरातील प्रतिनिधी यांनी मंदिरातील धार्मिक महत्त्व अध्यात्मिक महत्त्व टिकवण्यासाठी आणि मंदिरांचा विकास करणे यावरती सर्वतोपरी ते सर्व पुजारी बांधवांनी सहकार्य करण्याची भूमिका पर्यावरण पूरक विकासाची एकत्रितपणे भूमिका घेतली.

या बैठकीसाठी गोवा पुरोहित अर्चक मठ मंदिर आयाम विश्व हिंदू परिषद श्री अनिलजी सांबरे तसेच श्री राजकुमार भारद्वाज कोकण प्रांत प्रमुख यांनी उपस्थित मंदिर पुजारी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे नवी मुंबई मुंबई पालघर येथील अनेक पुजारी बांधव मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!