सामाजिक

कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवासाठी विनामूल्य बस सेवेचे आयोजन !

राजमुद्रा न्यूज नेटवर्क, मुंबई

मुंबई येथे स्थित कोकणातील गणेशभक्तांसाठी गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी जाण्यासाठी ५० बसेसचे आयोजन भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपा महामंत्री मुंबई-संजय उपाध्याय आणि सुहास आडीवरेकर यांच्या विशेष सहकार्याने करण्यात आले होते. या मोफत बससेवेचे व्यवस्थापण कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेने केले होते. यावेळी संस्थापक अजित पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपेश सावंत, विजय बाईत, दयानंद मांडवकर, सचिन दिवाळे, ओंकार कदम, विलास सावंत, सिद्धू सावंत, जयवंत जोशी, संतोष जाधव, दशरथ पांचाळ यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

या मोफत प्रवासाचा लाभ सुमारे २००० पेक्षा अधिक कोकण वासिय गणेशभक्तांनी घेतला. या वेळी सुप्रसिद्ध मसाले उद्योजक शालिग्राम खातू यांनी गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही सर्व प्रवाशांना भेट वस्तू म्हणून कापडी पिशवी तसेच पावभाजी मसाला पॅकेट, रेसिपी बुक, आरती पुस्तक व खेळण्यासाठी पत्यांचा संच दिला. प्रवासा नंतर अनेक भक्तांनी घरी पोहचताच कोकण कट्टा सदस्यांना संपर्क साधून आभार मानले. तसेच संजय उपाध्याय यांच्या या मोलाच्या सहकार्यामुळेच हा भव्य दिव्य उपक्रम यशस्वी होऊ शकला. बस जेथून सोडल्या त्या ठिकाणच्या स्थानिक रहिवासीयांनी तसेच मार्बल सिऱ्यामिक व्यापाऱ्यांनी, विलेपार्ले पोलिसांनी, मनपा के वार्ड, वाकोला वाहतूक पोलिसांनी यां उपक्रमासाठी योग्य सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!