श्री समर्थराज प्रतिष्ठानचे आरोग्य शिबीर यशस्वी संपन्न !
राजमुद्रा न्यूज नेटवर्क, मुंबई
श्री समर्थराज प्रतिष्ठान, कोकण कट्टा आणि पी.एस. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबीर एम.आय.डी.सी. विभागात सुभाष नगर येथे भरविण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी पी. एस. फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप शर्मा, स्वीकृती प्रदीप शर्मा यांची उपस्थिती लाभली. या शिबिराला कोकण कट्टाचे संस्थापक अध्यक्ष अजित दादा पितळे, सुजीत कदम, विजय बाईत, दयानंद मांडवकर उपस्थित होते. श्री समर्थराज प्रतिष्ठानचे मधुकर हेगडे व प्रभाकर खेडेकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रतिष्ठानच्या महिला उज्वला ऐवाळे व मनिषा शिर्के तसेच सर्व सदस्यांनी उत्तम नियोजन केले होते. शेकडो स्थानिक नागरिकांनी या विनामूल्य आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
केनिया हॉस्पिटलच्या वतीने नेत्र तपासणी करण्यात आली पी. एस. फाऊंडेशनच्या वतीने डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमातून तपासनिसाठी डॉक्टर उपस्थित होते. अनेक गरजू लहान मुले, ज्येष्ठ नागरिक,महिला, पुरुष रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. सकाळी १० ते दुपारी २ सुमारे ४ तासाहून अधिक वेळ शिबीर सुरु होते. विभागातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिष्ठानचे प्रत्यक्ष कौतक केले.



