“विश्वबंधुत्व” दिनानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन !
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी विलेपार्ले-अंधेरी शाखा आणि म. ल. डहाणूकर अलुमनी असोसिएशन आयोजित
राजमुद्रा न्यूज नेटवर्क, मुंबई
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी विलेपार्ले-अंधेरी शाखा आणि म. ल. डहाणूकर अलुमनी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने “विश्वबंधुत्व”दिनाचे औचित्य साधुन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी विलेपार्ले-अंधेरी शाखा संपर्क प्रमुख स्मिता द. पुराणिक यांनी दिली.
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, ही अध्यात्म प्रेरित सेवा संघटना आहे. गेली ५१ वर्षा सातत्याने १३३२ शाखा आणि २६ राज्यामध्ये प्रकल्प, आणि सेवाप्रकल्पांच्या माध्यमातून “मानव सेवा हीच माधवसेवा” हे तत्व आपले अंतिम ध्येय समजून संपूर्ण देशामध्ये योग, संस्कार, स्वाध्याय, आणि केंद्र वर्गाच्या माध्यमातून कार्य करीत आहे. स्वामी विवेकानंदांचे मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थानचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंदांनी सर्व धर्म परिषदेमध्ये शिकागो येथे आपल्या भाषणातून जगाला विश्वबंधुत्व ही संकल्पना पहिल्यांदा जगासमोर मांडली. त्यांनी भारत ही सर्वाधिक विकसित संस्कृति आणि परिपूर्ण द्यान लाभलेली भूमी आहे हे संगितले. तेव्हा पासून ११ सप्टेंबर हा दिवस “विश्वबंधुत्व दिन” सार्या जगामध्ये साजरा केला जातो. त्या निमित्ताने अभिनेते, लेखक, व्यवस्थापण आणि अर्थतज्ञ दीपक करंजीकर यांचे व्याख्यान गुरूवार ३ ऑक्टोबर, रोजी सायंकाळी ६ वाजता केशवराव घैसास सभागृह, म. ल. डहाणूकर कॉलेज विलेपार्ले, पूर्व येथे होणार आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी विनामूल्य आहे. सर्वांनी या व्याख्यानमालेला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.



