सामाजिक

न्याय हक्कासाठी शेकडो संतप्त आदिवासी पेण प्रांत कार्यालयावर धडकले !

  • जानेवारी २०२४ रोजी आदिवासी वाड्यांना जोडणारे रस्ते मंजूर करण्यात आले होते. त्या संदर्भात वर्कआर्डर देण्यात आली आहे. १० महिन्यानंतरही काम सुरू न करणाऱ्या ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पेण प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत उंबरमाल, खवसावाडी येथील आदिवासी वाड्यांच्या रस्त्यांच्या विकास निधीमध्ये झालेल्या गैर वापराची चौकशी करण्यात येईल.
  • तांबडी येथील सभागृह खैरासवाडी वडमालवाडी, माळवाडी, काजूवाडी या वाड्यांच्या रस्ते उंबरमाळ येथील शाळा इमारत दुरुस्ती चे प्रस्ताव तात्काळ करण्यात येईल असे गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी सांगितले.
  • तहसीलदार सचिन शेजाळ यांनी आदिवासींच्या प्रलंबित जातीच्या दाखल्यांचे अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील असे आश्वासन दिले.
  • खैरासवाडी शेजारी असलेल्या दगड खाणी बाबत आदिवासींना होत असलेल्या समस्यांसाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसात प्रत्यक्ष पाहणी करण्यास पाठविले जाईल असे सांगितले.
  • प्रांत अधिकारी प्रविण पवार खवसावाडी, काजूवाडी, उंबरमाल या आदिवासी वाड्यांना १५ डिसेंबर २०२४ रोजी भेट देऊन प्रत्यक्ष पहाणी करण्याची ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!