भक्ति

‘झाडे लावा, पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा !

कळंबोली, नवी मुंबई येथे महिलांनी घेतला पुढाकार ऋषीपंचमी निमित्ताने वृक्षरोपणाला सुरवात

संजय कदम, पनवेल

झाडे लावा झाडे जगवा ही एक छोटीशी उक्ती आणि छोटीशी कृती जरीज्ञ असली तरी त्याचा पर्यावरणावरती किती मोठा आणि सखोल फरक पडतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण वर्षानुवर्षे एकच गोष्ट ऐकत आहोत. झाडे लावा झाडे जगवा कारण झाडांचा आपल्या पर्यावरणावरती खूप परिणाम होतो पूर्वीच्या काळी जर आपण बघितले तर कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाचा आणि प्रदूषणाचा कोणताही ऱ्हास आपल्याला दिसून येत नाही. कारण पूर्वीच्या काळी घनदाट जंगल होती लोकसंख्या कमी होती, त्यामुळे आपल्या पृथ्वीवरील बहुतांश भाग हा झाडांनी व्यापला होता आज काल वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे ही घनदाट जंगले तोडली जात आहेत त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, दुष्काळ यासारख्या समस्यांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे. सर्व समस्या सोडविण्यासाठी आता एकच आपल्याकडे उपाय आहे तो म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगवा पर्यावरणाचे महत्त्व घेउन ऋषीपंचमी निमित्ताने
पंचशीला सोसायटी, सेक्टर ६ ,कळंबोली, नवी मुंबई येथे महिलांनी पुढाकार घेऊन वृक्ष रोपणाला सुरवात केली आहे. आपल्या देशात वृक्ष लागवडचे महत्व विचारात घेउन पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी देशी वृक्ष अंबा, वड, पिंपळा सारखे दिर्घ काळ टिकणारी वृक्ष लावा असा संदेश या महिलांनी दिला.

या वेळी ज्योती खैरे, निर्मल शहासने, सुप्रिया कोठावळे, दर्शना ठाकुर, मेघा सिंह, राजश्री औताडे या महिलांनी झाडांचे महत्त्व सांगीतले. “झाडामुळे जमिनीतील पाणी टिकून राहण्यास मदत होते आणि वेळोवेळी पाऊस पडण्यास ही मदत होते. अवलंबून आहे माणसाचे अन्न आणि पाणी या मूलभूत गरजांसाठी आपल्याला झाडांची आवश्यकता आहे. एका छोट्या रोपट्यापासून आणि छोट्या वेलीपासून ते मोठ्या वृक्षापर्यंत सगळ्यात झाडांमध्ये काही ना काही औषधी गुणधर्म सापडतात.आपली भारतीय संस्कृती तर पूर्ण जगामध्ये या औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे ते फक्त आपल्या भारताला मिळालेल्या निसर्गसौंदर्यामुळेच म्हणजेच झाडांमुळे अन्न आणि पाण्या प्रमाणेच दररोजच्या वापरातील जसे की कापड ,घराचे फर्निचर, औषधे, रबर , दररोजच्या वापरातील जळण्याचे लाकूड यासारख्या मूलभूत गरजा झाडांच्या मुळे तर पूर्ण होतात.

झाडे लावा झाडे जगवा !

झाडामुळे जमिनीतील पाणी तग धरून राहते. दिवसेंदिवस केल्या जाणाऱ्या वृक्षतोडीमुळे जंगलातील वन्य प्राणी यांची प्राण्यांच्या वस्तीकडे वाटचाल चालू आहे. वन्य प्राण्यांचे तर संपूर्ण कालचक्र झाडावरती अवलंबून आहे. जंगलतोडी मुळेच पर्यावरणाचा तोल ढळत आहे. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहे अशी अनेक संकटे आपल्यासमोर उभी आहेत. प्रचंड वृक्षतोडीमुळे पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाण्याचीच नाही तर अन्नाची सुद्धा कमतरता जाणवेल. कारण झाडे असतील तरच पाऊस येईल आणि पाऊस येईल तरच अन्न पिकेल हे सारे एक निसर्गचक्र आहे. सगळ्या गोष्टी या एकमेकांवर अवलंबून आहेत आणि यामध्ये जर झाडे हा मुख्य घटकच नसेल तर सगळेच निसर्गचक्र बदलून जाईल.

यासाठी आपल्याला आत्तापासूनच एक जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाने एक झाड जरी लावले तरी किती फरक पडेल याचा आपण विचारही करू शकत नाही. दरवर्षी पावसाळ्यामध्ये एक झाड लावून त्याचा व्यवस्थित रित्या सांभाळ करून जर ते झाड वाढवले तर आपले येणारे पिढी , दिवसेंदिवस होणाऱ्या प्रदूषणापासून वाचू शकेल. झाडामुळे सूर्यापासून येणारे अतिनील किरण रोखण्यास मदत होते ज्या भागांमध्ये झाडांचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते तेथे हवेतील ओझोन वायूचा स्तर चांगल्या प्रकारे दिसून येतो.
वृक्षरोपण कार्यक्रम राबवण्यासाठी प्रकाश खैरे, ओमकार खैरे यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!