पेण येथे भाजपा सांस्कृतीक सेल तर्फे भजन स्पर्धेचे आयोजन !
आ.रविशेठ पाटील व माजी आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

किरण बांधणकर, पेण
पेण विधान सभा मतदार संघ भारतीय जनता पार्टी तर्फे भजनामृत भजन स्पर्धा २०२४ वारकरी भजन आणि संगीत भजन स्पर्धेचे आयोजन ५,६ आणि ७ ऑगस्ट या तिन दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हॉटेल सौभाग्य इन, गणपती वाडी – पेण येथे करण्यात आले आहे.
आज पहिल्या दिवशी पेण मतदार संघाचे भाजप आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या हस्ते भजनामृत भजन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. भजनामृत भजन स्पर्धा २०२४ पेण, पाली, सुधागड आणि रोहा मतदार संघाचे आमदार रवीशेठ पाटील यांच्या संकल्पनेतून माजी आमदार धैर्यशील पाटील, रायगड भाजपा लोकसभा प्रमुख सतिषजी धारप यांच्या संकल्पनेतून भजनामृत भजन स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. ही भजन स्पर्धा मोफत असून श्रोत्यांना पवित्र अशा श्रावणाच्या पहिल्या सोमवार पासुन तीन दिवस वारकरी भजन, संगीत भजनाची जणू पर्वणीच मिळणार आहे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, सरचिटणीस मिलिंद पाटील,पेण तालुका सरचिटणीस संजय डंगर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.


