पनवेल एस.टी.स्टॅण्ड परिसरातून महिला दोन मुलांसह झाली बेपत्ता !
संजय कदम, पनवेल
पनवेल एस.टी.स्टॅण्ड परिसरातून एक महिला तीच्या दोन मुलांसह बेपत्ता झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सादमानी मोहम्मद अखिल अलवी (२२ रा.वडखळ) ही तिच्या दोन लहान मुलांसह कोपर खैरणे येथून ओला उबेर कॅबने पनवेल एस.टी.स्टॅण्ड जवळ आली होती. याबाबत तीने तशी माहिती आपल्या पतीला दिली होती. जेव्हा पती तीला घेण्यासाठी पनवेल एस.टी.स्टॅण्ड परिसरातून आले तेव्हा तेथे ती आढळून आली नाही. तसेच तिचा मोबाईल सुद्धा बंद मिळून आला आहे. ती रंगाने गोरी, उंची ५ फुट १ इंच, अंगाने सडपातळ, चेहरा उभट, डोक्याचे केस काळे असून अंगात लाल रंगाचा सुट सलवार त्यावर काळ्या रंगाचा बुरखा परिधान केलेला तसेच काळ्या रंगाची चप्पल पायात आहे. तिला हिंदी भाषा अवगत आहे. सोबत मुलगा अबुजर (४) व मुलगी आयत (३) हे आहेत. तिच्यासोबत मोबाईल फोन आहे. या तिघांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे दुरध्वनी क्र. २७४५२३३३ किंवा पो.हवा.अतुल देवकर यांच्याशी संपर्क साधावा.

