राजकीय

… त्या बॅनमुळे पेण तालुक्यातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या !

मुख्यमंत्र्यांसोबत शिशिर धारकर यांचा बॅनर ; पेणमध्ये चर्चेचा विषय.

प्रतिनिधी, पेण

पेण को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक या सहकारी बँकेत १५ वर्षांपूर्वी सुमारे ७५८ कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. सदर बँकेतील सुमारे २ लाख ठेवीदारांना १५ वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर देखील आज तागायत यश मिळाले नाही. आजही अनेक ठेवीदार आणि खातेदार आपल्या कष्ठाचे पैसे मिळतील या आशेवर आहेत.

पेण को-ऑपरेटिव्ह बँकचे मुंबईत दादर, गिरगाव व विलेपार्ले असे ३ शाखा तर रायगड जिल्ह्यात १५ शाखा एकूण १८ शाखा होत्या. या बँकेत १ लाख ९८ हजार गोरगरीब ठेवीदारांचे कष्टाचे पैसे जमा होते. परंतु या बँकेत ७५८ कोटी रुपयांचा घोटाळा होऊन ठेवीदारांचे कष्टाचे पैसे अडकले आहेत. आणि घोटाळे करणारे तात्कालीन अध्यक्ष बॅनरबाजी करण्यात व्यस्त आहेत.

१५ वर्षांपूर्वी रिझर्व बँकेने सदर बँकेवर निर्बंध लादले. त्यामुळे हा घोटाळा समोर आला. यावेळी संबंधित आरोपींवर पोलीस कारवाई सुद्धा करण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळासह तात्कालीन अध्यक्ष शिशिर धारकर यांना प्रमुख आरोपी करुन जेलची हवा देखील खावी लागली होती.

बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले बँकेचे माजी अध्यक्ष शिशिर धारकर यांचा पेण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अवंती इमारत येथे लागलेला बॅनर ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्या सोबत असलेल्या बॅनरच्या माध्यमातून “प्लास्टर ऑफ पॅरिस गणपती मूर्ती वापरण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबद्दल फडणवीस यांचे आभार माणले आहेत”.

या बॅनरच्या माध्यमातून धारकर हे आपली प्रतिमा उंचवीन्याचा आणि येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आपल्या समर्थकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहेत. मात्र या बॅनरवर असलेला मुख्यमंत्र्यांचा फोटो “शिशिर धारकर आणि त्यांच्या समर्थकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राजकीय बळ देणार असेल” अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. तर दुसरीकडे काही नागरिक खरच शिशिर धारकर यांनी पीओपी वर असलेली बंदी उठविण्यासाठी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांकडे पत्रव्यवहार करुन प्रयत्न केले आहेत का ? या विचारात आहेत.

शिशिर धारकर हा पेण अर्बन बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. त्याचे राजकीय भविष्यात आता संपलेले आहे. पण सत्तेत असलेल्या बड्या नेत्यांच्या फोटोचा वापर करुन आणि येऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पुन्हा आपले राजकीय बस्तान बांधण्याचा प्रयत्न असे बॅनर लावून करू पहात आहे. तसेच करोडोरुपयांची बोगस कर्जे करुन ठेवीदारांचे पेसै लुटणा-या संबधीत कथीत-बोगस कर्जदारांवरील कारवाई संबंधीची साधी चर्चा जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये टाळण्यात आले. एकुणच हा सर्वप्रकार बैंक बुडव्यांना पाठीशी घालण्याचा व ठेवीदारांच्या हिताचा बळी देयासारखेच आहे. हे अत्यंत निषेधार्ह आहे. नाईलाजाने या बाबत मा. उच्चन्यायालयात अर्ज दाखल करावा लागणार आहे. – नरेन जाधव (कार्याध्यक्ष – पेण अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समिती)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!