आखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या तालुका अध्यक्ष पदी रंजना घरत यांची निवड !
प्रतिनिधि, पेण
महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी रंजना प्रभाकर घरत यांची निवड करण्यात आली आहे. महिला जिल्हा अध्यक्षा उमा कुसमुडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन रंजना घरत यांच्यावर तालुका पदाची नव्याने जबाबदारी देण्यात आली आहे.
अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ही संघटना आणि संघटनेचे पदाधिकारी ओबीसींच्या न्यायाहकासाठी आणि इतर सामाजिक कार्यासाठी अग्रेसर असुन या सेवा संघाच्या पेण तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष पदावर रंजना घरत यांची निवड झाली असल्याने तालुक्यातील पदाधिकारी आणि सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. जिल्हा अध्यक्षा उमा कुसमुडे यांनी देखील त्यांचे अभिनंदन करून तालुक्यामध्ये सेवा संघाचे काम जोमाने करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार आणि उमा कुसमुडे यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती चोखपणे पार पाडून अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविणे, मेळावे लावणे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे यांसारख्या सर्वसमावेशक गोष्टी करून सेवा संघाचे सभासद कसे वाढवता येतील याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले.




