ठळक बातम्याताज्या बातम्याराजकीय

रोहा आणि पेण (रायगड) रेल्वे स्थानकांचा समावेश “अमृत भारत स्टेशन” योजनेत करण्यात यावा – खा. सुनिल तटकरे

राजमुद्रा न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी रेल्वे संदर्भातील विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा खा. तटकरे यांनी केली. तसेच या भेटीदरम्यान रायगड जिल्ह्यातील रोहा आणि पेण या रेल्वे स्थानकांचा समावेश “अमृत भारत स्टेशन” योजनेत करण्यात यावा, यासाठीचे निवेदन रेल्वे मंत्र्यांना देण्यात आले. पेण तालुक्यातील जनतेकडून खा. तटकरे यांच्या ह्या मागणीचे स्वागत होत आहे.

अमृत भारत स्टेशन या भव्य योजनेंतर्गत आतापर्यंत १२०० हून अधिक स्थानकांचे नूतनीकरण करण्यात आले आहे/होत आहे, ज्याचा उद्देश देशभरातील स्थानकांमध्ये नव्या पातळीची सुविधा आणि जोडणी निर्माण करणे हा आहे. ही योजना इतर अनेक उपक्रमांशी सुसंगत असून ग्रामीण आणि दुर्गम भागांतील लोकांसाठी आर्थिक संधी वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सक्षम नेतृत्वाखाली या योजनेने मिळवलेल्या यशाची दखल घेत, आपले लक्ष रायगड जिल्ह्यातील रोहा व पेण रेल्वे स्थानकांवर केंद्रित करून त्या स्थानकांचा या योजनेत समावेश करण्याची नम्र विनंती करीत आहे. रोहा व पेण ही ऐतिहासिक शहरे असून या परिसरांचा संबंध थोर शिवयोद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी आहे.

हे दोन तालुके गणेश मूर्ती व अन्य हस्तकलेच्या वस्तूंचे कलेच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहेत. या हस्तकलेच्या परंपरेने हजारो कुशल कारागिर आणि त्यांच्या कुटुंबियांना उपजीविकेचे साधन मिळवून दिले आहे. या मूर्ती विविध मंडप व घरांमध्ये ठेवण्यात येतात आणि या भागातील लोक त्यांच्यावर प्रेम करतात. या भागातील हस्तकला परंपरेमुळे अनेक तरुण, महिलांना रोजगाराच्या संधी मिळतात. हे कारागीर त्यांच्या तयार केलेल्या वस्तू राज्यभर व परिसरात पोहोचवण्यासाठी रेल्वे सारख्या वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असतात.या भागाचा आर्थिक विकास असूनही, सध्या रोहा व पेण रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा, मालवाहतूक हाताळणीची सोय, व अंतिम टप्प्यातील (last-mile) जोडणी यांचा अभाव आहे – हे सर्व घटक वाढीला अडथळा ठरतात व स्थानिक समुदायांवर ताण निर्माण करतात. रोहा आणि पेण या स्थानकांचा समावेश अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत केल्यास हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, जे पायाभूत सुविधांचा विकास, रोजगाराच्या संधी, आणि आर्थिक विकास घडवून आणू शकते. तसेच, स्थानिक प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. असे खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!