राजुशेठ पिचिका यांच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन !
त्यांची कन्या “लाहिरी” हिच्या हस्ते झाले उद्घाटन
अरविंद गुरव, पेण
पेण येथील प्रसिद्द उद्योजक आणि समाजसेवक राजुशेठ पिचिका यांच्या “नायरा” या कंपनीच्या पेट्रोल पंपाचे उद्घाटन आज पेण येथील सावरसई गावाजवळ झाले. या पेट्रोल पंपाचे उद्घाटन राजुशेठ यांची कन्या “लाहिरी” हिच्या हस्ते झाले. या पेट्रोल पंपाचे व्यवस्थापन रामेश्वर पेटोलियम यांचेकडे असणार असल्याचे राजुशेठ पिचिका यांनी सांगितले..
पेण तालुक्याचा वाढता विस्तार आणि वाढती वाहनांची संख्या लक्षात घेऊन उद्योजक राजुशेठ पिचिका यांनी हा पेट्रोल पंप सुरु केला आहे. पेण शहरासह ग्रामीण भागातील वाहन चालक या मार्गावर प्रवास करीत असताना पेट्रोल/डिजेल संपल्याने वाहकांची मोठी गैरसोय होत होती. त्यामुळे सर्व वाहन चालकांचा प्रवास सोईचा व्हावा यासाठी हा पेट्रोल पंप सुरू करण्यात आला असल्याचे राजुशेठ पिचिका यांनी सांगितले.
या उद्घाटन प्रसंगी उद्योजक राजूशेठ पीचिका यांसह त्यांचे कुटुंबीय, खासदार धैर्यशील पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, महादेव दिवेकर, निवृत्ती पाटील, उद्योजक प्रकाश झावरे, दयानंद भगत, डोलवी गावचे सरपंच परशुराम म्हात्रे, संजय डंगर, शोमेर पेनकर आदींसह सामाजिक, राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लावली होती.




