ठळक बातम्याताज्या बातम्याराजकीयसामाजिक

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा हमारापूर गणेश मूर्तीकार संघटनेतर्फे जाहीर सत्कार !

पेणमधील जगप्रसिद्ध अशा प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेशमूर्तींवर केंद्र शासनाने बंदी आणली होती. त्यामुळे पेणमधील नाही तर राज्यातील गणेशमूर्ती कारखादार आणि मूर्तिकारांची मोठी कोंडी झाली होती. प्लास्टरच्या मुर्त्यांबाबत संभ्रम कायम असल्याने तयार झालेल्या लाखो गणेशमूर्त्यांचे करायचे काय ? असा प्रश्न गणेशमूर्ती कारखानदारांसमोर उभा राहिला होता. मात्र मात्र गणेशोत्सवाच्या अवघे काही दिवस आधी न्यायालयाने पीओपी वरील बंदी शिथिल केल्यामुळे पेण तालुक्यातील तसेच राज्यातील पीओपी गणेश मूर्तीकारांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पीओपी गणेशमूर्तींवरील बंदी शिथिल केल्याबद्दल पेण तालुक्यातील हमरापूर-तांबडशेत येथे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचा गणेश मूर्तिकार संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. मात्र या सत्कार समारंभाला राजकीय रंग चढल्याची स्पष्ट छाप उमटली. मूर्तिकारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर असताना केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर निर्माण झालेला तणाव, आणि त्यानंतर न्यायालयात सरकारच्या बाजूने मांडलेली भूमिका यामुळे बंदी शिथिल झाली. याच पार्श्वभूमीवर झालेल्या या सत्कार सोहळ्यात मंत्री शेलार यांनी “ही आमची जबाबदारी होती, पीओपीवरचा अन्याय दूर करणे हे आमचे कर्तव्य होते,” असे सांगत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तथापि, या सत्कार समारंभात सतत घेतले जाणारे राजकीय संदर्भ, विरोधकांवर हल्ले आणि श्रेय घेण्याची चढाओढ यामुळे हा कार्यक्रम सामाजिक सन्मानापेक्षा राजकीय मंच असल्याचे दिसून आले.

यावेळी बोलताना संस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी त्यावेळी असणाऱ्या मविआ सरकारवर कडाडून टीका करत मविआ सरकार नेहमीच हिंदू सण आणि संस्कृतीच्या विरोधात उभे राहिले आहे. यावेळी आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांना आणि नेत्यांना शहरी नक्षलवादी असेही संबोधले. तसेच पीओपीच्या नावाखाली पर्यावरण दूषित होतेय असे सांगण्यासाठी काही हरामखोर मंडळी पुढे होती. त्याना उलथवून टाकण्यासाठी आम्ही उच्च न्यायालायात लढा दिला आणि आम्ही प्रदूषण होत नाही हे पटवून  दिले. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य मार्गदर्शन केले त्यामुळेच पीओपी नावाचे संकट पूर्णपणे बाजूला करू शकलो. याचा आम्हाला आनंद आहे असे वक्त्यव्य सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी हमरापूर तांबडशेत तालुका पेण येथे आयोजित सत्कार सोहळ्यासाठी आले तेव्हा ते बोलत होते.

आज झालेला हा माझा सत्कार हे फक्त निमित्त आहे. हिंदू सण आणि उत्सव यांची परंपरा कायमस्वरूपी टिकावी आणि येथील गणेशमूर्तीकरांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी बाप्पाच्या आशीर्वादाने मी माझे कर्तव्य बजावले आहे. पाण्यातील पर्यावरण विरोधी दावा खरे पाहता सन २००३ मध्ये काँग्रेसचे सरकार असतानाच दाखल करण्यात आला होता. मात्र त्या दाव्यात पीओपीच्या मूर्तींचा मुद्दा नसताना काँग्रेस सरकारने ही बाब का लक्षात घेतली नाही? त्यानंतर आत्ता सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि या जिल्यातील शेकाप हे महाविकास आघाडी सरकार असताना देखील त्यांना ही बंदी उठविण्याची सुबुद्धी सुचली नाही. या मविआ सरकारने नेहमीच हिंदूंच्या सणांवर संक्रांत आणण्याचे काम केले आहे. मात्र ज्यावेळी मी सांस्कृतिक कार्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला त्यानंतर मी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन घेऊन केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे पाठपुरावा करून आणि राज्यशासनाने मूर्तिकारांची बाजू न्यायालयात ठामपणे मांडल्यानंतर या पीओपी वरील बंदीला स्थगिती दिली आहे असे सांगितले. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार रविंद्र पाटील, प्रशांत ठाकूर, वैकुंठ पाटील यांनी देखील आपले गणेशमुर्तीकारांबाबतचे परखड मत मांडले. थोडक्यात आज झालेल्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या सत्कार समारंभाला राजकीय श्रेयवादाची किनार प्रामुख्याने दिसून आली. यावेळी आशिष शेलार यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

या सत्कार समारंभला राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, खासदार धर्यशील पाटील, आमदार रवी पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, नीलिमा पाटील, चित्रा पाटील, वैकुंठ पाटील, प्रीतम पाटील, शर्मिला पाटील यासंह मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी, अभय म्हात्रे, कुणाल पाटील, नितीन मोकल,  हितेश जाधव, सुनील पाटील, आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!