पेण तालुक्यातील नागरिकांनी कॅनरा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा – मुख्य महाप्रबंधक रंजीव कुमार
कॅनरा बँकेच्या पेण शाखेचे उद्घाटन
१९०६ साली स्थापना झालेली ११८ वर्षींची ग्राहक सेवेची परंपरा असलेल्या कॅनरा बँकेचे आज देशभरात ९ हजार ८०० हून अधिक शाखा आहेत. ठेवीदारांच्या पसंतीस उतरलेली कॅनरा बँक ही विश्वसनीय सरकारी बँक आहे. बँकेची २६ लाख कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. कॅनरा बँक ही भारतातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे. बँकेमार्फत पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांना करिता जिवनधारा योजना, महिलांसाठी कॅनरा एंजल योजनेअंतर्गत तीन लाख ते दहा लाखांचे हेल्थ इन्शुरन्स, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी आकर्षक विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. बँकेच्या विविध योजनांचा पेण तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे मुख्य महाप्रबंधक रंजीव कुमार यांनी पेण शाखेच्या उद्घाटन प्रसंगी केले.

पेणच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील व बँकेचे मुख्य महाप्रबंधक रंजीव कुमार यांच्या शुभहस्ते कॅनरा बँकेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रीतम पाटील म्हणाल्या की तिसऱ्या मुंबईचा केंद्र पेण तालुका असून येणाऱ्या काळात या परिसराचा कायापालट होणार आहे. या विभागात मोठा आर्थिक विकास होणार आहे. बँकेच्या प्रगतीसह तालुक्यातील नागरीकांचांही आर्थिक विकास होईल असे प्रतिपादन त्यांनी केले.
बँकेच्या या शाखेमधून येथील उद्योगांना, उद्योजकांना व्यापाऱ्यांना पतपुरवठा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पर्सनल लोन, गाडीसाठी कर्ज, गृह कर्ज व सोने तारण कर्ज उपलब्ध होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींना अर्धा टक्का अधिक व्याजदर मिळणार आहे. पेण शहरात बँकेने नवीन शाखा सुरू केल्यामुळे बँकेने येथील नागरिकांनी करिता झिरो बॅलन्स अकाउंट ओपनिंग सुविधा सुरू केली आहे. या शाखेमार्फत ग्राहकांना लॉकर सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे. पीपीएफ अकाउंट, सुकन्या समृद्धी योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री जिवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आदींसह अनेक गुंतवणुकीचे पर्याय या शाखेमार्फत ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. या बँकेचे संपूर्ण देशात 11000 हून अधिक एटीएम आहेत ज्या द्वारे पैसे काढण्याची व एटीएम द्वारे पैसे जमा करण्याची सुविधा देण्यात येते. पेण शाखेतही एटीएम ची सुविधा उपलब्ध आहे. अशी माहिती बँकेचे उपमहाप्रबंधक दिपक सक्सेना यांनी याप्रसंगी दिली.
ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यासाठी कॅनरा बँक कटिबद्ध आहे. कॅनरा बँकेसाठी ग्राहक सर्वात मोठी ठेव आहे. कॅनरा बँकेत खाते उघडून बँकेच्या सर्व योजनांचा लाभ पेण तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा. येथे अपंग व जेष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या काउंटरची सोय करण्यात आली आहे अशी माहिती बँकेचे व्यवस्थापक आनंदराव पालवे यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाला मुख्य महाप्रबंधक रंजीवकुमार, उपमहाप्रबंधक रजनिश कुमार, उपमहाप्रबंधक दिपक सक्सेना, सहायक महाप्रबंधक शंकर एस.राव, शाखा प्रबंधक आनंदराव पालवे, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, राजश्री पाटील, गौतम पाटील, दर्शन बाफना, रवींद्र म्हात्रे, यांच्यासह तालुक्यातील व्यापारी, उद्योजकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

