ताज्या बातम्या

हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र.

राजमुद्रा न्यूज नेटवर्क, मुंबई

महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्र अवलंबलं आहे. त्यात हिंदीसोबत इतर भाषांचा पर्याय विद्यार्थ्यांना दिला आहे. मात्र त्यात हिंदी वगळता इतर भाषेसाठी काही अटी घातल्या आहेत. त्यावरून पुन्हा राजकारण पेटले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या विषयावर पत्रकार परिषद घेत राज्यात हिंदीची सक्ती का लादली जातेय असा संतप्त सवाल विचारला आहे. कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे हिंदीकरण होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

त्याशिवाय राज यांनी महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांनाही पत्र पाठवले आहे. मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. जो हाणून पाडला पाहिजे. यात एकतर मुलांचे नुकसान आहेच पण मराठी भाषेचे नुकसान आहे. मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार हवी ती भाषा शिकू शकतात पण आतापासूनच भाषेचे ओझे त्यांच्यावर कशाला असं सांगत सरकारच्या राजकारणाला शाळांना बळी पडू नका असं राज ठाकरे यांनी पत्राद्वारे म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!