प्रत्येक पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकून हा महत्वाचा घटक असतो – व.पो.नि. नितीन ठाकरे
संजय कदम, पनवेल
प्रत्येक पोलीस ठाण्यात मुद्देमाल कारकून हा महत्वाचा घटक असतो. पनवेल शहर पोलीस ठाण्यात या ठिकाणी कार्यरत असणारे पोलीस हवालदार रवींद्र कुंभार यांनी त्यांच्यावर सोपविलेला कारभार हा २०१७ पासून प्रामाणिकपणे पार पाडला. त्याचे कौतुक संपूर्ण पोलीस ठाण्याला असल्याचे प्रतिपादन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांनी पोलीस हवालदार रवींद्र कुंभार यांच्या बदलीनिमित्त त्यांचा विशेष सत्कार करताना केले.
पनवेल शहर पोलीस ठाण्यात २०१७ पासून मुद्देमाल कारकून विभागात कार्यरत असणारे पोलीस हवालदार रवींद्र कुंभार यांची नुकतीच एपीएमसी पोलीस ठाण्यात बदली झाल्याने त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी वपोनि नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक प्रवीण भगत व इतर पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या उपस्थितीत त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी त्यांच्या आतापर्यंत केलेल्या कामाचे कौतुक केले. कामाविषयी असलेले प्रेम व कर्तव्य भावना कुंभार यांनी वेळोवेळी दाखवून दिल्या आहेत. त्यांच्या कारभारामुळे पुढे येणार्या इतर कर्मचार्यांना सुद्धा आपले कामकाज सुरळीत करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रवींद्र कुंभार यांच्यासह काम केलेल्या अनेक कर्मचारी व अधिकार्यांनी आपल्या त्यांच्या विषयी असलेल्या आपलुकी व प्रेमाच्या भावना यावेळी व्यक्त केल्या.




