कोकण कट्टाच्या मानुसकीच्या भिक्षाफेरितुन “बालग्राम” च्या बालकांसाठी १७५० किलो धान्य भेट.
प्रतिनिधी, पेण
“कोकण कट्टा” ह्या विलेपार्ले येथील समाजसेवी संस्थेने शनिवारी ग्राम संवर्धन सामजिक संस्थेतील “बालग्राम” प्रकल्पाच्या अनाथ, गरीब, आदिवासी आणि गरजू बालकांसाठी माणुसकीच्या भिक्षाफेरीतून जमा झालेले १७५० किलो धान्य भेट स्वरूपात दिले आहे.
कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण कट्टाचे खजिनदार सुजित कदम, जगन्नाथदादा गावडे, अशोक भोईर, निशिकांत मोरे यांनी शनिवारी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यालयात जावून सदरचे धान्य ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. मागील पाच वर्षापासून कोकण कट्टा दरवर्षी ग्राम संवर्धनच्या अनाथ बालकांसाठी धान्याची मदत करत आहे. यावेळी माणुसकीच्या भिक्षा फेरीसाठी ज्या-ज्या देणगीदारांनी धान्याची मदत केली त्या सर्वांचे संस्थेच्या वतीने संतोष ठाकूर यांनी आभार व्यक्त केले.

