खारघर मधील इमारतीला आग !
संजय कदम, पनवेल
खारघर शहरातील सेक्टर ७ मधील रावेची हाइट्स या निवासी इमारतीत बुधवारी दुपारी आगीची लागल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहिती नुसार, दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये ही आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आगीचा व्हिडीओ वरुन आंदाजावरुन येवढ्या मोठ्या प्रमाणात घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास फ्लॅटमधून अचानक धुराचे लोट बाहेर येताना पाहून इमारतीतील रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना व अग्निशामक दलाला याबाबत कळवले.

