क्राईम

पेण – रामवाडी येथे भुरट्या चोरांचा धुमाकूळ

अंधाराचा फायदा घेवून गर्दुल्ल्यांची वाढती दहशत ;- नागरिक भयभीत

पेण ( किरण बांधणकर )

पेण शहरातील रामवाडी येथे भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला असून जवळ जवळ तीन – चार घरातून चोरी केल्याची घटना समोर आली आहे.


गेली तीन दिवस पेण तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरु आहे .त्यातच नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे स्ट्रीट लाईट बंद असल्याने आणि नागरिकांची रहदारी नसल्याचा फायदा घेत अज्ञात भुरटे चोर चाकूचा धाक दाखवून सर्व सामान्य माणसांना लुटत आहेत. तसेच पाकीट मार, गंठण चोरने अश्या गोष्टी घडत आहेत. रात्री फिरणाऱ्या या गर्दुल्ल्यांनी अनेकांच्या घरातून मोबाईल लंपास केले आहेत परंतु या चोरांचा मोठी चोरी करण्याचा डाव फसल्याचा संशय नागरिकांना येत आहे.तसेच रेल्वे ट्रॅकच्या ब्रिज खाली या गर्दुल्यांचा अड्डा असल्याचे बोलले जात आहे.


रामवाडी झिंझे चाळीत राहणे प्रमोद रमेश वडे यांच्या घरी सकाळी पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास २ मोबाईल चोरीला गेले. तर त्याच चाळीतील आणखी दोन घरात अश्याच प्रकारे चोरी झाली असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. जर वारंवार चोरी होत असेल तर हे चोर आता मोठा डल्ला मारायला ही कमी पडणार नाहीत अशी शंका निर्माण होत आहे. रेल्वे ट्रॅक जवळून येताना जाताना महिलांना व विद्यार्थ्यांना या गर्दुल्ल्यांची भीती निर्माण झाली आहे. यासाठी पोलिसांनी विशेष सापळा रचून या भुरट्या चोरांच्या वेळीच मुसक्या आवळणे गरजेचे आहे. तसेच भाडयाने राहणाऱ्या प्रत्येक भाडेकरूंची ओळखपत्रे घर मालकाने घेतली पाहिजेत अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!