सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी योगेश पाटीलची रवानगी न्यायालयीन कोठडीत
आरोपीला १९ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी
प्रतिनिधि, पेण
रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यात अधिकारी पदावर असलेला आणि पेण तालुक्यातील रावे येथील योगेश बाळकृष्ण पाटील याच्यावर तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सदर तरुणीने तक्रार दाखल करताच योगेश पाटील याला पेण पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. योगेश याची पोलीस कस्टडी संपल्यानंतर आत्ता न्यायालयाने त्याला १९ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. योगेश सध्या अटक आहे.
पीडित तरुणीने लेखी तक्रार दाखल करताच पोलिसांनी योगेश पाटील यांच्यावर भारतीय न्याय सहिता २०२३ कलम ६९, ३५१ (२), ३५२ या कलमां अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपी योगेशला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कस्टडी संपल्यानंतर न्यायालयाने बलात्कारी योगेश पाटीलची १९ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस करीत आहेत



