पनवेल येथे आढळला महिलेचा मृतदेह.

संजय कदम, पनवेल
पनवेल परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून तिच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर महिलेचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षे, सडपातळ बांधा, डोक्याचे केस लांब काळे व पांढरे, उंची ५ फुट २ इंच असून, पायाच्या अंगठ्यामध्ये तांब्याचे जोडवे आहेत. तसेच उजव्या हातामध्ये तांब्याचे कडे परिधान केलेले आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पो.उपनिरीक्षक उद्धव सोळंके यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन पनवेल पोलिस प्रशासनाने केले आहे.



