प्रेम विवाह केला म्हणून कुटुंबाला मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी !
पेण – कोलेटीवाडी येथील घटना : वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

प्रतिनिधि, पेण
पेण येथील कोलेटी वाडी येथे प्रेम विवाह केला म्हणून भोय कुटुंबाने ठाकूर कुटुंबांना मारहाण केली असून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत वडखळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत.
दामोदर बाळाराम ठाकुर वय-56 वर्षे, व्यवसाय-चालक, रा. कोलेटीवाडी, पो. पळस, ता. पेण घरामध्ये हे त्यांच्या पत्नी आणि दोन मुले विजय आणि अक्षय तसेच सुनांसोबत एकत्रित रहात आहेत. दमोदर यांचा लहान मुलगा अक्षय याने त्यांच्याच गावातील श्रुष्टि तुकाराम भोय या तरुणी सोबत प्रेम संबंध होते. त्यामुळे आमच्या रितिरिवाजा प्रमाणे दोघांच्या संमतीने लग्न लावून दिले. मात्र हे लग्न आणि त्या दोघांचे असणारे प्रेम संबंध हे श्रुष्टि हिच्या घरच्या लोकांना मान्य नव्हते आणि तेव्हापासून ते आमच्या कुटुंबावर राग धरून होते. असे दामोदर ठाकुर यांनी वडखळ पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हंटले आहे.
श्रुष्टि चे वडील दिलीप भोय व त्यांच्या नातेवाईकांनी लोखंडी रॉड, लाथा बुक्क्यांनी दामोदर ठाकुर आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली. सर्व जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आरोपी दिलीप हाशा भोय, शैला हाशा भोय, पुष्पा हाशा भोय, तुकाराम हाशा भोय, निर्मला तुकाराम भोय, कृष्णा दिलीप भोय, मानसी तुकाराम भोय, मधुरा पांडुरंग भोय, विनीता रमाकांत नाईक, दिवेज तुकाराम भोय, नामीबाई हाशा भोय, अंश पांडुरंग भोय, सचिन दामोदर भोय, अवनाश दामोदर भोय, सुरेखा पांडुरंग भोय, अविनाश दा. भोय, सुरेखा पांडुरंग भोय, दिलीप भोय अशा १७ जणांनी दामोदर ठाकूर आणि त्यांच्या कुटुंबांना मारहाण केली असून ठाकूर कुटुंबाला ठार मारण्याची धमकी ही दिली असल्याचे भोय कुटुंब व नातेवाईकांच्या विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार केली असून भा.द.वी. ११५ (२), ११८(२), १२५, १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३५२, ३५१(२) या प्रमाणे गुन्हे दाखल केले असून वडखळ पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल (२०३३) महेश मधुकर ठाकूर हे पुढील तपास करीत आहेत.


