करमणूकठळक बातम्याताज्या बातम्याराजकीयराज्य/देश विदेशलोकल

विरोधकांनो अफवा पसरवू नका; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये – संजय जांभळे

राजेश प्रधान, पेण

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीचे बिगुल वाजले आणि रायगड जिल्ह्यात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद गटातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार संजय जांभळे हे उमेदवारी अर्ज मागे घेणार अशा अफवा विरोधकांकडून पसरवल्या जात होत्या त्या अफवांचे खंडन करण्यासाठी संजय जांभळे यांनी आज त्यांच्या राहत्या घरी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर तोप डागली. त्यांनी सांगितले की, माझी उमेदवारी ही जनतेने कौल देऊन उभी केली आहे. माझ्या मतदारसंघांमध्ये माझ्या कामामुळे आणि जन संपर्कामुळे माझी लोकप्रियता कायम आहे.

मी मैदान सोडणार नाही तर मैदानात गाजवणारा आहे विरोधकांनी माझ्याविरुद्ध अपप्रचार न करता जमिनीवर खेळावे म्हणजे त्यांची लायकी त्यांना कळेल. मी माझ्या समाजाशी आणि जनतेशी गद्दारी करणारा नाही. मी जनतेच्या सुखदुःखात सहभागी होतो. माझी उमेदवारी आणि माझा विजय हा माझा जनतेने निश्चित केला आहे. विरोधकांनी कितीही अपप्रचार केला त्याचा फरक मला पडणार नाही असे संजय जांभळे यांनी विरोधकांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सुनावले.

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई जयंत पाटील यांचे पाठबळ आणि माझ्या मतदार संघातील जनतेचे आशीर्वाद यामुळे माझा विजयाचा मार्ग सुखकर झाला आहे. येत्या मंगळवारी २७ जानेवारी रोजी क्षेत्रेश्वर मंदिर वडखळ येथून प्रचाराचा नारळ फोडून मी प्रचाराला सुरुवात करणार आहे. यावेळी माझ्या तमाम जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संजय जांभळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!