एज्युकेशनठळक बातम्याताज्या बातम्या

भाऊसाहेब नेने महाविद्यालयात रायगड जिल्हा एनएसएस वार्षिक नियोजन शिबिर उत्साहात पार !

मान्यवरांचे मार्गदर्शन, पुरस्कार वितरण व कार्यकर्त्यांचा सन्मान

प्रतिनिधी, पेण

भाऊसाहेब नेने महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रायगड जिल्हा प्राध्यापकांच्या उपस्थितीत वार्षिक नियोजन शिबिराचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

शिबिराचे उद्घाटन पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍड. मंगेश नेने यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. प्रास्ताविक रायगड जिल्हा समन्वयक प्रा. तुळशीदास मोकल यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. कु. सुषमा खोत यांनी विद्यापीठ गीत आणि महाराष्ट्र गीत सुमधुर आवाजात सादर करून केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांनी एनएसएस कार्यातील आवश्यक आणि अनावश्यक बाबींवर मोजक्या शब्दांत मार्गदर्शन केले. उद्घाटक अॅड. मंगेश नेने यांनी भाऊसाहेब नेने महाविद्यालयातील एनएसएस कार्याचे कौतुक करत कार्यकर्त्यांचा गौरव केला. यावेळी विद्यापीठस्तरीय पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

मुंबई विद्यापीठाचे पीओ रमेश देवकर यांनी वर्षभरातील एनएसएस कार्याचे नियोजन स्पष्ट केले. मुंबई उपविभाग समन्वयक श्री. निखिल कारखानिस यांनी अभ्यासक्रमातील एनएसएस विषय आणि प्रत्यक्ष कार्याचे महत्त्व उदाहरणासहित सांगितले. दुपारी भोजनानंतर प्रा. तुळशीदास मोकल यांनी सुव्यवस्थित एनएसएस कार्याच्या आवश्यक बाबी मांडल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. तुकाराम माळवे यांनी दिवसभराच्या शिबिरात सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. सदानंद धारप, कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष लकडे, प्रा. सौ. सायली पितळे, डॉ. प्रगती पाटील, प्रा. सुषमा खोत, प्रा. रुपरेल भौतिक, प्रा. राजपूत, प्रा. सुप्रिया धुमाळ, प्रा. राधिका गोंधळी, प्रा. अस्मिता पाटील आणि प्रा. ठाकूर यांचे विशेष सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!