आ. रवीशेठ पाटील यांनी केली नागोठने येथील पूरग्रस्त भागाची पाहणी
तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश

पेण – राजमुद्रा न्यूज नेटवर्क
रायगड जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेण, पाली, नागोठणे येथे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
नोगोठणे येथील अंबा नदीला आलेल्या पुराने नागोठणे शहरातील कोळीवाडा, बाजारपेठ, बस स्थानक परिसरात मोठे नुकसान झाले. कोळीवाडा,बाजारपेठ येथील अनेक घरात तसेच दुकानात आठ ते दहा फूट पाणी शिरून मोठे आर्थिक नुकसान झाले. आज पेण विधानसभा मतदार संघांचे आमदार रवीशेठ पाटील यांनी नागोठणे शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी उपस्थित असलेल्या तलाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश रवीशेठ पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी रोहा तालुका भाजप अध्यक्ष सोपान जांभेकर, मारुती देवरे, लाड आदिंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



