कोकण कट्टा सामाजिक संस्थे तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.
प्रतिनिधी, पेण
श्रावण महिन्यातील पहिला शनिवारचे औचित्य साधून कोकण कट्टा या सामाजिक संस्थे तर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा तारा आणि आदिवासी आश्रम शाळेतील सुमारे ७० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आपटा येथील श्री स्वामी समर्थ विश्व् कल्याण केंद्र येथे आज करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि आपण समाजाचे काही तरी देणे लागतो हे लक्षात घेऊन हे वाटप करत आहोत असे कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांनी सांगितले. तर समाज सेविका पुष्पलता पाटील यांनी सांगितले की कोकण कट्टा कडून नेहमीच मदतीचा हात येथील आदिवासी आणि गरीब गरजू मुलांना भेटतो या पुढे ही मिळावा असे आपले विचार व्यक्त करताना सांगितले.
यावेळी शाळेच्या प्राध्यापिका पुष्पा शिर्के, समाज सेविका पुष्पलात पाटील, शाळेचे शिक्षक निलेश कोळी, कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे, संस्थेचे सदस्य सुजित कदम, विवेक वैध, दादा गावडे, श्री स्वामी समर्थ मठाचे सेवेकरी बाळकृष्ण वेंगुर्लेकर, मठाचे व्यवस्थापक प्रदीप मोहीते, राजन राऊत, पत्रकार अरविंद गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.



